Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai News : मद्यधुंद चालकाची मुजोरी, पोलिसाच्या अंगावरच घातली गाडी, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: सोशल मीडियावर सध्या अंधेरीमधील घटना व्हायरल होतेय, ज्यात मद्यधुंद चालकाकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न झालाय.

Tanvi Pol

Shocking Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम धक्कादायक घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असात एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या घटनेत दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. घटना व्हायरल होताच संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले असून कार चालकाविरोधात संपात व्यक्त केला जात आहे.

नेमके काय घडले?

तक्रारदार पोलीस(Police) हवालदार जयवंत मोरे हे सहार वाहतूक विभागात कार्यरत असून ते गोखले पुलाजवळ तपासणी करत होते. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची कार आली, ज्याच्या ड्रायव्हरने मुद्दाम कार रस्त्यावर वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. सध्या घडलेल्या घटने प्रकरणी अंधेरी(Andheri) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घडलेल्या घटनेत कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. ऐवढेच नाही तर तेथून पळ काढताना बॅरिकेड्स तोडले आणि ज्यात रस्त्यावर असलेल्या २ ते ३ गाड्यांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण घटना अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली. घडलेल्या घटनेच्या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. सभ्यसाची निशांक अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अंधेरीतील संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशस मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''saamtv'' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' पोलिस सुरक्षित नाही , सामान्य नागरिक कोटून सुरक्षित असणार'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT