driving licence fact check: मोबाइल नंबर अपडेट न केल्यास लायसन्स रद्द होणार? saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Will Your Driving Licence Be Cancelled If Mobile Number Is Not Updated? : २५ सप्टेंबरपर्यंत तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट केला नाही तर, वाहनचालक परवाना आपोआप रद्द किंवा निलंबित होईल, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घ्या.

Nandkumar Joshi

driving licence mobile number update viral message fact check : वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) शी लिंक केलेला मोबाइल नंबर अपडेट करण्यासंबंधी एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक असलेला मोबाइल नंबर २५ सप्टेंबरपर्यंत अपडेट केला नाही तर, लायसन्स रद्द किंवा निलंबित केले जाईल, असा दावा करण्यात येत आहे. तर मोबाइल नंबर अपडेट करण्याची अखेरची मुदत २६ सप्टेंबर असल्याचा दावा काही व्हायरल मेसेजमध्ये करण्यात येत आहे. या व्हायरल होणाऱ्या पोस्ट बघून टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही. कारण हा व्हायरल मेसेज बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ईटीच्या रिपोर्टनुसार, रस्ते वाहतूक मंत्रालय आणि परिवहन यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक असलेला मोबाइल नंबर अपडेट करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२६ आहे. पण तो नंबर अपडेट केला नाही तर, लायसन्स आपसुकच निलंबित किंवा रद्द होईल, अशा प्रकारचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही.

परिवहन पोर्टलवर सध्या तरी ड्रायव्हिंग लायसन्सधारक आणि वाहन मालकांना आपला मोबाइल नंबर Vahan आणि Sarathi पोर्टलवर अपडेट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, योग्य आणि अपडेट मोबाइल नंबर असल्यास परिवहन सेवेशी संबंधित मेसेज, आवश्यक सूचना आणि नोटिस वेळेवर योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. विशेष म्हणजे त्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही.

२५ सप्टेंबरनंतर लायसन्सचं काय होणार?

रिपोर्टनुसार, सध्या तरी उपलब्ध अधिकृत माहितीप्रमाणे अशा कोणत्याही सूचना किंवा निर्देश नाहीत. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर सर्व ड्रायव्हिंग लायसन्स रद्द किंवा निलंबित होतील, अशा प्रकारची सूचना कुठेही देण्यात आलेली नाही. परिवहन विभागाच्या वेबसाइटवर मोबाइल नंबर अपडेट करण्यास सांगितले जाते. मात्र, अंतिम तारखेची मुदत संपल्यानंतर लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्याबाबतचा मेसेज बनावट आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज बघून चिंता करण्याचं कारण नाही.

अनेकांचे ड्रायव्हिंग लायसन्स हे खूपच जुने आहेत. या काळात कदाचित अनेकांचे मोबाइल क्रमांक बदललेले असतात. अशा वेळी ओटीपी आधारित सेवा मिळवणे किंवा परिवहन विभागाशी संबंधित सूचना मिळवण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अनेकदा मोबाइल नंबर अपडेट ठेवण्याचे आवाहन करण्यात येते. पण आताचा मोबाइल नंबर अपडेट न केल्यास लायसन्स रद्द होण्यासंदर्भात व्हायरल होणारा मेसेज दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Saturday Horoscope: या ४ राशींच्या आयुष्यात आज महत्त्वाचे बदल घडणार; काम, पैसा आणि नात्यांबाबत मिळणार खास संकेत

SCROLL FOR NEXT