Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भररस्त्यात पार्क केला जेसिबी, ड्रायव्हरचा उर्मटपणा पाहून नेटकरी संतापले; VIDEO व्हायरल

JCB Viral Video: एका ड्रायव्हरने भररस्त्यात जेसिबी पार्क केला आहे. ड्रायव्हरचा हा उर्मटपणा पाहून नेटकरी संतापले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जेसीबी (JCB) भर रस्त्यावर उभा असल्याचं दिसत आहे. चालक झोपेचं नाटक करताना दिसत आहे. जेसीबीमुळे रस्त्यावर ट्राफिक जाम झाला आहे. एका व्यक्तीने या जेसीबी चालकाला उठवले. त्याला रस्त्याच्या मधोमध लावलेला जेसीबी काढण्यास सांगितलें आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

असे अनेक व्हिडिओ सोशल (Driver Park JCB Middle Road) मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून अतिशय संताप येतो. असाच हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला पाहून काही लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत तर काही प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय एक जेसीबी रस्त्याच्या मधोमध उभा असून चालक झोपलेला (Traffic Jam) आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जेसीबी वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. बराच वेळ रस्त्यावरून जेसीबी न हलल्याने काही लोक पुढे आले आहेत. त्यांनी (Viral Video) चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका व्यक्तीने जेसीबीवर चढून पाहिले असता चालक झोपला असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ वेगात सोशल मीडियावर फिरत आहेत. चालकाच्या या कृत्यावर अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत (Viral) आहेत.

रस्त्यावर उभा असलेला हा जेसीबी एखाद्या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया काही लोकांनी दिली आहे. अनेकजण यावर मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने लिहिलंय की, कदाचित त्याला ओव्हरटाइम काम करायचं (Viral News)नाही. जिथे वेळ संपली तिथे त्याने जेसीबी उभा केला आहे.

एका यूजरने लिहिलंय की, कदाचित चालक दारूच्या नशेत आहे.रस्त्याच्या मधोमध जेसीबी पार्क करून तो इतरांचा जीव धोक्यात घालत आहे आणि कायदाही मोडत असल्याचं एका युझरने म्हटले (Viral Video News)आहेत. अनेकजण या चालकाची पोलिसांकडे तक्रार करण्याची मागणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT