Viral Stunt Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: पोलिसांना चकवा देण्यासाठी फिल्मी स्टंट; भर हायवेवर तब्बल २ किमीपर्यंत गाडी उलटी पळवली| थरारक VIDEO

Viral Stunt Video: पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी एका चालकाने रिव्हर्स गिअरमध्ये तब्बल २ किलोमीटरपर्यंत गाडी पळवल्याची घटना घडली. या प्रकरणावरुन उत्तरप्रदेशचे नेते सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही संताप व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

Ghaziabad Viral Video:

देशामध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याने, बेदरकारपणे गाड्या चालवल्याने अनेकदा अशा घटना घडतात. वाहन चालवताना वाहनचालकांकडून अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. त्यामुळे भीषण अपघात होतात. अशा अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ उत्तरप्रदेशमधून समोर आला आहे.

गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापुरम 'एलिव्हेटेड' रस्त्यावर पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी एका चालकाने रिव्हर्स गिअरमध्ये तब्बल २ किलोमीटरपर्यंत गाडी पळवल्याची घटना घडली. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर हायवेवर अशा प्रकारचा भयानक स्टंट केल्याने नेटकऱ्यांकरुन संताप व्यक्त केला जात आहे..

ही घटना बुधवारी रात्री (२१, फेब्रुवारी) दहाच्या सुमारास घडली. पोलीस नोंदणी क्रमांक प्लेटवरून चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा 46 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांची पीसीआर व्हॅन वाहन थांबवण्याचा प्रयत्न करत असताना चालक रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवत असल्याचे दिसत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणावरुन उत्तरप्रदेशचे सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात कायदा तोडणारे आणि कायदा रक्षक यांच्यात कसला करार आहे... दोन किलोमीटर उलटून गाडी चालवली, तरीही कार चालक फरार झाला." पोलिसांचे काम व्हिडीओ गेमसारखे खेळणे नाही, पोलिसांनी आपले कर्तव्य बजावून त्यावर सरकारचा झेंडा लावलेल्या गाडीला अटक करावी, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT