Viral Video Donald Trump  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कुल्फी विकणारे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा झाले व्हायरल; पाकिस्तानच्या गल्लोगली विकताय कुल्फी

Donald Trump Doppelganger: कुल्फीवाले चाचा चक्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसारखे दिसत आहेत.

Bharat Jadhav

Donald Trump Viral Video Selling kulfi :

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पविषयी कोणतीही बातमी. तसेच सोशल मीडियावर त्यांच्याविषयी काही पोस्ट केली तर इंटरनेटवर खूप व्हायरल होत असते. त्याचमुळे पाकिस्तानातील कुल्फीवाले चाचा व्हायरल झाले आहेत. ते का त्यांच कारणं जाणून घेण्यासाठी ही व्हायरल स्टोरी वाचावी लागेल. (Latest News)

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्यक्ती पाकिस्तानच्या रस्त्यांवर कुल्फी विकताना दिसत आहे. हे कुल्फीवाले चाचा चक्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसारखे दिसत आहेत. 'कचा बदाम'चं गाणं म्हणून शेंगदाणे विकणाऱ्या भुबनसारखं गाणं म्हणत कुल्फी विकत आहेत. या कुल्फी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान पाकिस्तानचे कुल्फीवाले डोनाल्ड चाचा २०२१ मध्येही व्हायरल झाले होते. एखाद्या युझरला २०२१ दिवस परत आठवले असतील कदाचित त्यामुळे त्याने या कुल्फी विकणाऱ्याचा व्हिडिओ परत एकदा सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडिओ जुना जरी असला तरी तो आपल्याला पाहू वाटतं हे मात्र नक्की. २०२१ जून महिन्यात डोनाल्ड ट्रम्पचा डोपलगँगर कुल्फी विकताना दिसला होता. तो त्याच्या आईस्क्रीमच्या गाड्यासमोर कचा बदाम सारखं गाणं म्हणत कुल्फी विकताना दिसला होता.

दरम्यान आता व्हायरल केलेला व्हिडिओ शेहजाद रॉय यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. वाह, क्या बात है कुल्फीवाले भाई, क्या बात है... असं कॅप्शनही या व्हिडिओला दिलंय. ट्रम्प सारखा दिसणारा कुल्फी विक्रेता हा पाकिस्तानातील पंजाबमधील साहिवाल जिल्ह्याचा रहिवाशी आहे.

स्थानिक लोक त्याला 'चाचा बग्गा' असे संबोधतात. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कुल्फी विक्रेता मंत्रमुग्ध आवाजात गाणं गात कुल्फी विकत आहे. त्याचं गाणं एखाद्या प्रशिक्षित संगीत कलाकारासारखं वाटतं. पाकिस्तानच्या गल्लींमध्ये ग्राहकांना बोलवण्यासाठी तो "अय कुल्फी...कुल्फी! आ...खोया कुल्फी, कुल्फी, कुल्फी," असं गाणं गात कुल्फी विकताना दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT