Dog Driving Car Saam TV
व्हायरल न्यूज

Dog Driving Car: अरेच्चा! कुत्र्याने चक्क कार चालवली; ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Ruchika Jadhav

Dog Driving Car:

कुत्रा हा एक इमानी प्राणी आहे. अनेक व्यक्ती आपल्या घरी कुत्रा पाळतात, त्यांना जीव लावतात. जी व्यक्ती कुत्र्यावर माया करते त्याला जीव लावते अशा व्यक्तींशी श्वान नेहमीच इमानी राहतात. अनेक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यांना आपल्यासारखे लाईफस्टाइल जगू देतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा वाहन चालवतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक कुत्रा आपल्या कारमध्ये बसून आरामात कार चालवत आहे. कार चालवताना जनू काही या कुत्र्याला एकदम परफेक्ट ड्रायवींग येतेय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. कारमध्ये फक्त कुत्रा आणि त्याच्या शेजारी एक मुलगा बसलेला आहे. या दोघांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

कारच्या स्टेअरींगवर कुत्र्याने हात ठेवलाय आणि तो कार चालवतोय. इतकचं नाही तर हा कुत्रा वाहतूक कोंडीमधून कार चावत आहे. वाहतूक कोंडी फोडून वाट काढत आहे. @Animal Care या इस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला एक लाखांहून अधिक लाइक्स मिळालेत. व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट देखील आल्या आहेत. अशा गोष्टींसाठी विश्वास असणं गरजेचं आहे, असं एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

तर अन्य काही यूजर्सनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलंय की, आज तेरा भाई गाडी चलायेगा, कुत्रा वाहतूक पोलीस दिसल्यावर त्यांना म्हणेल तू मला चावून तर दाखल मग मी तुला चावेल, अशीही एक मजेशीर कमेंट या व्हिडीओवर आली आहे.

व्यक्ती आपल्या पाळीव श्वानांना विविध स्टंट शिकवतात आणि त्यातून पैसे कमवतात. काही रिंगमधून उड्या मारणे, हवेत झेप घेऊन चेंडू झेलणे असे बरेच स्टंट शिकाऊ श्वान करतात. मात्र आजवर कोणत्याच व्यक्तीने श्वानाला ड्रायव्हिंग करण्यास सांगितलेलं नाही. कारण ही फार गंभीर गोष्ट आहे. कितीही झालं तरी एका मुक्या प्राण्याला अशा टेक्नीकल गोष्टी समजत नाहीत. श्वानाच्या छोट्याशा चुकीमुळे अपघात देखील होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT