Diwali Special Song SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Diwali Special Song: आई दिवाली सफाई ओ रामजी; दिवाळी स्पेशल गाण्याचा VIDEO व्हायरल

Diwali Special Song: सध्या देशभरात सगळीकडे दिवाळीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या काही दिवसाआधी प्रत्येक घरात साफसफाईची सुरुवात होते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali Special Song

सध्या देशभरात सगळीकडे दिवाळीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या काही दिवसाआधी प्रत्येक घरात साफसफाईची सुरुवात होते. सफाई करणे काही जणांसाठी कटांळवाना विषय असतो तर काहींना हे काम आवडतं. सफाई करताना काही लोक गाणे गुणगुणतात. याचवेळी आपल्याला काही लोकांमधला छुपा गायकही मिळतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे याद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीला आपल्यातील कला दाखवण्याची संधी मिळत असते. अशातच सोशल मीडियावर एका तरुणीने गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याची खासियत अशी आहे की हे गाणं खास दिवाळीच्या सफाईवर बनवलं आहे.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका तरुणीने दिवाळीच्या कटांळवान्या सफाईवर मजेशीर गाणे तयार केले आहे. हे गाणे सर्वसामान्य जनतेला आवडेल असे आहे. या तरुणीने तिच्या इन्टांग्रामवर वेगवेगळ्या प्रसंगावरील गाण्यांचे व्हिडीओ तयार केले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलाय. केस खराब होऊनयेत म्हणून तिने केसांवर रुमाल देखील बांधलाय. दरवाजा आणि टॅरेसच्या पायऱ्यांवर सफाई करताना ही तरुणी दिसतेय. कंटाळवाणं वाटणाऱ्या सफाईवेळी तरुणीचं हे गाणं तुमच्याही फायद्याचं ठरू शकतं.

व्हायरल व्हिडिओ इन्टांग्रामवरील @voiceofkaja या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. नेमका हा व्हिडीओ कुठल्या ठिकाणाचा आहे हे समजू शकले नाही. सदर व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजर्संने लिहील आहे की'दिदी मस्त गाण तयार केल आहे..'या व्हिडीओवर प्रचंड व्हूज मिळाले असून जास्त प्रमाणात शेअरही केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT