Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: कडक नान पाण्यामध्ये धुवून घेतला; रात्रीचं शिळं जेवणं ताजं करण्यासाठी महिलेची भन्नाट ट्रीक

Woman Washing Naan In Water: सामान्य कुटुंबात रात्रीचं उरलेलं जेवण कधीच कोणी फेकून देत नाही. रात्रीचा भात, पोळी, आमटी भाकरी सर्व जेवण पुन्हा गरम करून खाल्लं जातं.

Ruchika Jadhav

Video:

रात्रीचं शिळं जेवण अनेकांच्या घरामध्ये उरतं. घरी एखादी पार्टी किंवा काही फंक्शन असेल तर तेव्हा मोठी मेजवाणी असते. पाहुण्यांना कमी पडायला नको त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जास्तीचं जेवण बनवलं जातं. रात्रीचं जास्तीचं जेवण अनेकजण फेकून देतात. मात्र बऱ्याच घरांमध्ये रात्रीचं उरलेलं जेवण आणखी आवडीने खाल्लं जातं.

आता सर्वसामान्य माणसांच्या घरी तर ते हमखास होतं. सामान्य कुटुंबात रात्रीचं उरलेलं जेवण कधीच कोणी फेकून देत नाही. रात्रीचा भात, पोळी, आमटी भाकरी सर्व जेवण पुन्हा गरम करून खाल्लं जातं. सध्या सोशल मीडियावर शिळं जेवण खातानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रात्रीची उरलेली पोळी, भाकरी आणि नान असे पदार्थ सकाळी फार कडक होतात. कडक झालेला नान किंवा पोळी खाताना दात दुखूलागतात. त्यामुळे नान बारीक असणे गरजेचं असतं. यासाठी एका तरुणीने कडक झालेला नान नळाखाली पाण्यात भिजवत ठेवला आहे. नान पाण्यात भिजवून घेतल्यानंतर तरुणीने त्यावर तेल आणि बटर लावून तव्यावर शेकून घेतलं आहे.

अशा पद्धतीने रात्रीचा उरलेला कडक नान तिने नरम किंवा सॉफ्ट बनवण्यासाठी पाण्याचा वापर केला आहे. तरुणीने वापरलेली ही ट्रीक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @everythingalishay या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, रात्रीचं जेवणं सकाळी खाण्याची मजा काही औरच आहे.

रात्री उरलेल्या जेवणात नान आणि ब्रेड जर जास्त उरले आणि सकाळपर्यंत कडक झाले तर ते पाण्यात भीजवून घ्यावे. पाण्यात भिजवल्याने ते नरम होतात. तसेच तेल लावून तव्यावर भाजून घ्यावे. यामुळे ब्रेड किंवा नान पुन्हा नव्याने बनवल्याप्रमाणे मऊ होईल. असं तिने यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर कमेंटमध्ये ही ट्रीक आम्हाला आवडल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT