Emoji Pani Puri Video Saam TV
व्हायरल न्यूज

Emoji Pani Puri Video : भारतात पहिल्यांदाच Emoji पाणीपुरी; तुम्ही चव चाखली का? पाहा VIDEO

Emoji Pani Puri Viral Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क Emoji पाणीपुरी दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की यामध्ये भारतात प्रथमच Emoji पाणीपुरी असं म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

भारतातील विविध मसाल्यांसह चमचमीच पदार्थ अगदी जगप्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी प्रत्येकाला आवडते. विविध फ्लेवर्समधली पाणीपुरी मुलींची कायम फेवरेट राहिली आहे. तुम्हाला सुद्धा पाणीपुरीची बातमी वाचताना आताच तोंडाला पाणी सुटलं असेल. चटकदार पाणीपुरीचे आजवर अनेक भन्नाट आणि अतरंगी व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. त्यात आणखी एका व्हिडिने सध्या सोशल मीडियावर हवा केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क Emoji पाणीपुरी दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की यामध्ये भारतात प्रथमच Emoji पाणीपुरी असं म्हटलं आहे. प्रत्येक व्यक्तीला विविध भावना असतात. याच भावना सांगणाऱ्या सर्वच Emoji शेपमध्ये ही पाणीपुरी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही दु:खी असताना सॅड इमोजी असलेली पाणीपुरी खाऊ शकता. तर आनंदी असताना हॅप्पी इमोजी असलेली पाणीपुरी खाऊ शकता.

कुठे मिळते Emoji पाणीपुरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेली Emoji पाणीपुरी गुजरातमध्ये उपलब्ध आहे. नेक्सस अहमदाबाद वन मॉल फूड कोर्टमध्ये Emoji पाणीपुरीचा स्टॉल लावण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार विविध फ्लेवरमध्ये सुद्धा Emoji पाणीपुरी एन्जॉय करू शकता. या स्टॉलवर अगदी १०० वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये ही पाणीपुरी मिळते.

सिल्वर, गोल्ड, चॉकलेट, मॅक्सिकन, रगडापुरी, बुंदीपुरी, मधपुरी या आणि अशा असंख्य फ्लेवर्सच्या पाणीपुरी सध्या येथे उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर @ahmedabad_food_trend या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखांच्या घरात लाईक्स आणि व्हुव्ज मिळाले आहेत. काहीतरी युनीक आणि हटके असल्याने खवय्यांनी लगेचच येथे Emoji पाणीपुरीची चव चाखत एन्जॉय केलं आहे.

सोशल मीडियावर या आधी पिझ्झा पाणीपुरी, चिझ पाणीपुरी, चिकन पाणीपुरी, प्रॉन्स पाणीपुरी सुद्धा पाहायला मिळाली आहे. काही पाणीपुरी कॉम्बीनेशन अगदीच किळसवाणे वाटते. काही दिवसांपूर्वी मॅगी पाणीपुरी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र अशा सर्वच पाणीपुरीला नेटकऱ्यांनी आणि खवय्यांनी पाठ दाखवली. मात्र आता ही Emoji पाणीपुरी सर्वांना आवडली असून सोशल मीडियावर या पाणीपुरीची चव चाखण्याची अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT