Shreya Maskar
भारतातील लोक मोठ्या प्रमाणात पाणीपुरीचा आस्वाद घेतात.
पावसात चटपटीत पाणीपुरी खायचा आनंदच काही वेगळा असतो. पण पावसात पाणीपुरी खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसात कधीही स्ट्रीट पाणीपुरी खाणे टाळावे आणि घरीच चटपटीत पाणीपुरी बनवा.
पाणीपुरीमध्ये वापरले जाणाऱ्या पदार्थांमुळे शरीराला फायबर मिळते. त्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होते. उदा. बटाटा, गहू
पाणीपुरी बनवण्यासाठी उकडलेले पदार्थ वापरल्यामुळे त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पाणीपुरीच्या पाण्यामध्ये पुदिना, काळे मीठ, धणे, आले, जिरे इत्यादी पदार्थ असतात. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्या लोकांनी पाणीपुरी आवर्जून खावी.
पाणीपुरीच्या पाण्यात टाकण्यात येणाऱ्या जलजीरामुळे तोंडात आलेले फोड देखील बरे होतात.
पाणीपुरीच्या पाण्यात टाकण्यात येणारे काळ मीठ स्नायू मजबूत करतात. तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्यही सुधारते.
आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरी खाणे आरोग्यास फायदेशीर ठरते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.