Jugad Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Jugad Viral Video: वा रे पठ्ठ्या! थेट रिक्षाच्या छतावर उगवल्या भाज्या; अनोखा व्हिडिओ पाहून होतेय सर्वत्र चर्चा

Viral Video: सोशल मीडियावर अनेक रिक्षा चालकासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी हाणामारी तर कधी अपघातांचे. सध्या असाच एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात रिक्षाचालकाने भन्नाट जुगाड केलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर आपल्याला दररोज हटके व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेक असे व्हिडिओ आहेत जे पाहून डोक्याचा भुका होतो, तर अनेकदा अंगाचा थरकाप उडतो.तर सध्या अनेक व्हायरल व्हिडिओपैंकी एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यात एका रिक्षा चालकाचा अनोखा जुगाड पाहून सर्वत्र चर्चा सुरु आहे.

भारतात आपल्याला अनेक जुगाड करणाऱ्या व्यक्तींच्या गोष्टी ऐकायला मिळतात. मग त्यात कधी लहान गोष्टीमध्ये भन्नाट कल्पना सुचवणारे व्यक्ती असतील तर कधी भन्नाट जुगाड(Jugad) करणारे व्यक्ती असतात. यांचे किस्से सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रिक्षा चालकाचा आहे. ज्यात त्याने त्याच्या रिक्षाचा वापर करुन भाजीपाला उगवला आहे. नक्की पाहू तर असे काय आहे व्हिडिओत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक हिरव्या आणि पिवळ्या अशा दोन्ही रंगाचे एकत्रि करण असलेली रिक्षा (Rickshaw)दिसून येत आहे. या रिक्षाकडे तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला रिक्षाच्या छतावर लहान लहान गवत उगवलेले दिसून येत आहे.खरे तर हे नुसते गवत नसून,या रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षाच्या छतावर टॉमेटो तसेच भेंडी अशा अनेक भाज्या पिकवल्या आहेत.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@prateekkwatravlogs'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक व्यक्ती एका रिक्षा चालकाच्या अनोख्या संकल्पनेला पाहून त्याला सर्व विचारताना दिसत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता.त्यावर रिक्षा चालक त्याला त्याचा सर्व आलेल्या जुगाडवर व्यक्तीच्या प्रतिक्रिया काय येतात ते विचारत आहे.

प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) दिल्ली शहरातील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमधून समजते. व्हिडिओ व्हायरल होताच ७ लाखांच्या घरात फक्त लाईक्स मिळाले असून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'व्हा....'' तर अनेकांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर अनेकांनी गमतीदार अशा प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT