Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सिग्नल तोडला, दोन पोलिसांना बोनेटवर घेऊन कार दामटवली; VIDEO व्हायरल

Delhi Viral Video: दिल्लीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक कारचालक दोन पोलिसांना बोनेटवर घेऊन नेताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या हिट अँड रनच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. देशात अनेक हिट अँड रनच्या घटना घडत आहे. अशातच दिल्लीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दिल्लीत एका कारचालकाने दोन ट्राफिक पोलिसांना बोनेटवर घेऊन गेले आहे. कारचालकाने २० मीटरपर्यंत पोलिसांना नेले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Delhi Viral Video)

दिल्लीतील क्रिष्णग्रह येथे ही धक्कादायक घटना घटना आहे.एक कारचालक सिग्नल असतानाही जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा पोलिसांना त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने पोलिसांचे काहीच ऐकले नाही उलट पोलिसांनाच कारच्या बोनेटवर घेऊन कार पुढे नेली आहे.

व्हायरल व्हिडिओत, दोन पोलिस एका कारच्या बोनेटवर दिसत आहे. कारचालक या पोलिसांना बोनेटवर घेऊन कार भरधाव वेगाने चालवताना दिसत आहे. या कारचालकाने २० मीटरपर्यंत पोलिसांना नेलं आहे. त्यानंतर कारचालकाने युटर्न घेतला आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने कार चालवायला सुरुवात केली. यानंतर दोन्ही पोलिस कारवरुन खाली पडतात. ते कारला थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु कारचालक काही गाडी थांबवत नाही. या घटनेमुळे पोलिसच सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. पोलिसांना कोणीही घाबरत नसल्याचे चित्र समोर आले आहे. (Delhi Viral News)

या पोलिसांची नावे प्रमोद सिंग आणि शैलेश चव्हाण अशी आहे. त्यांना या घटनेनंतर रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. या घटनेतील आरोपी आणि त्याच्या कारचा पोलिस शोध घेत आहेत. (Delhi news In Marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अजित पवार उद्यापासून महाराष्ट्रात लावणार सभांचा धडाका

Jalgaon News : पाय घसरून नदीत पडल्याने चिमुकलीचा मृत्यू; अंघोळीसाठी गेले असताना घडली घटना

Vastu Tips : घड्याळ कोणत्या दिशेला लावावा?

Uddhav Thackeray : राज्यात तीन भाऊ, मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरे महायुतीवर कडाडले

VIDEO : 'मराठवड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहाणार नाही', किनवटच्या सभेत फडणवीसांची मोठं विधान

SCROLL FOR NEXT