Romance On Bike Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Romance On Bike Viral Video: ह्यांचं करायचं काय? भरधाव बाइक अन् पोरीला मांडीवर बसवून खुल्लमखुल्ला रोमान्स! व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप

Stunt On Bike Delhi Viral Video: दिल्ली पोलिसांनीही या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई केल्याचे सांगितले आहे

Gangappa Pujari

Couple Romance On Bike Viral Video: सोशल मीडियावर प्रत्येक क्षणाला नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली कोणतीही घटना एका सेकंदात सर्वांपर्यंत पोहोचते. हेच आजच्या आधुनिक युगाचे मोठे यश आहे. मात्र सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत.

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या असाच एक हौशी तरुण- तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही चालू गाडीवर रोमान्स करताना दिसत आहेत. (Viral Video News)

काय आहे व्हिडिओ...?

सोशल मीडियावर (Social Media) सध्या तरुणांच्या बाईक स्टंटचे (Bike Stunt Viral Video) अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भरधाव गाडीवर विचित्र कृती करताना तर कधी चक्क तरुणीसोबत गाडीवर रोमान्स करतानाचे व्हिडिओ अनेकदा लक्ष वेधतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुण- तरुणी चक्क चालू गाडीवर रोमान्स करताना दिसत आहे.

चालू गाडीवर रोमान्स...

भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी हा तरुण तरुणीला मांडीवर बसवून बिंधास्त रोमान्स करत आहे. हा व्हिडिओ राजधानी दिल्लीमधील असल्याचे सांगण्यात येत असून व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनीही कडक कारवाई केली आहे.

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण- तरुणी चालू गाडीवर स्टंट करताना दिसत आहेत. तरुणाने तरुणीला गाडीच्या टाकीवर बसवले आणि तिला मिठी मारायला सुरूवात केली. तरुणीही त्याला चालू गाडीवर मिठी मारताना दिसत आहे. हे धक्कादायक कृत्य भर वर्दळीच्या ठिकाणी चालू आहे.

दिल्ली पोलिसांची कारवाई...

त्यामुळे येणारी- जाणारी वाहन चालकही त्यांच्याकडे बघत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला असून दोघांवरही कठोर कारवाईची मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनीही या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई केल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

SCROLL FOR NEXT