Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्ली मेट्रोत दोन व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल मारामारी; नेटकरी म्हणाले, अ‍ॅनिमल पाहून आलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Fight Viral Video :

दिल्ली मेट्रो म्हणजे भांडणतंटा, प्रियकरांचा अड्डा आणि मनोरंजनाचे उत्तम ठिकाण झाले आहे असं म्हणायला हरकत नाही. दिल्ली मेट्रोतील प्रवाशांचे नेहमी मनोरंजन होत असते. कधी फॅशन शो तर डान्स, गाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोत दोन व्यक्तींमध्ये जबरदस्त भांडणे झाली. दोन व्यक्ती एकमेकांवर धावून गेले आणि हाणामारी करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Viral Video)

हा व्हिडिओ एक्स (Twitter) या प्लॅटफॉर्मवरुन @GharKekalesh या अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओत दोन व्यक्तींमध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे. सुरुवातीला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. त्यानंतर त्या दुसऱ्या व्यक्तीनेदेखील मारण्यास सुरुवात केली. दोघांनी एकमेकांना कानाखाली मारत, धक्काबुक्की केली. मेट्रोतील इतर प्रवाशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु हे दोघेही माघार घेत नव्हते. (Delhi Metro Viral Video)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर खूप मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अॅनिमल चित्रपट (Animal Movie)पाहून आले आहेत का? रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) पार्ट २ अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. तर अनेकांनी हे प्रकरण खूप गंभीर असल्याचे म्हटले आहे. दिल्ली मेट्रोत प्रवास करायला भीती वाटते, खूप जास्त भीषण आहे हे अशा कमेंट्स केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajinkya Rahane: रेडी टू स्ट्राइक...! अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला खिजवलं; खेळाडू फ्लॉप ठरताच केली 'अशी' पोस्ट

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT