Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत इंग्रजीत भांडण; दोन महिलांमध्ये जागेवरुन वाद, VIDEO व्हायरल

Viral Video: दिल्ली मेट्रो म्हणजे मनोरंजनाचा अड्डा. दिल्ली मेट्रोतील रोज नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी डान्सचे, गाण्यांचे तर कधी भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोतील असाच एक भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Viral Video:

दिल्ली मेट्रो म्हणजे मनोरंजनाचा अड्डा. दिल्ली मेट्रोतील रोज नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी डान्सचे, गाण्यांचे तर कधी भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोतील असाच एक भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोत जागेवरुन होणारी भांडणे हे काही नवीन नाही. मात्र, हे भांडण थोडे हटके आहे. या भांडणात दोन महिला जागेवरुन भांडताना दिसत आहे. एकमेकींच्या हाताला हात लागल्याने त्यांच्यात हे भांडण झाल्याचे दिसत आहे. व्हिडिओत या दोघीजणी हिंदीत नव्हे तर इंग्रजीत भांडताना दिसत आहे.

दिल्ली मेट्रोत आजपर्यंत हिंदीत, अगदी अर्वाच्च भाषेत होणारी भांडणे पाहिली असतील परंतु इंग्रजीत होणारे हे पहिलेच भांडण असेल. विशेष म्हणजे, या भांडणात या दोघीही काही वेळ इंग्रजीत भांडतात. त्यानंतर पुन्हा आपल्या मूळ भाषेत म्हणजे हिंदीत भांडू लागतात.

व्हिडिओत दोन महिला बाजूबाजूला बसलेल्या दिसत आहे. त्यात एक महिला भांडायला सरुवात करते. तुम्ही माझ्या जागेत बसलेल्या आहात. तुझा हात मला लागत आहे.त्यावर दुसरी महिला म्हणते, आधी तूझा हात मला लागला. तुझ्या हाताचे कोपर मला लागत आहे. त्यावरुन त्यांच्यात वाद होतो. हा वाद थोडा वेळ सुरू असतो.

काही वेळानंतर या दोन्ही महिला परत आपली मूळ भाषा म्हणजे हिंदीत भांडू लागतात. या व्हिडिओला भारतीय लोक कसे मेट्रोत इंग्रजी भाषेत बोलतात आणि लगेच पुन्हा आपल्या मातृभाषेत बोलतात याचे उत्तम उदाहरण. असे कॅप्शन दिले आहे.

या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हीच आहे दिल्ली मेट्रोची खासियत. आपले रंग कसे बदलायचे हे दिल्ली मेट्रोच्या प्रवाशांकडून शिकावे, अशा कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT