Manasvi Choudhary
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर रवींद्र बेर्डे याचं आज निधन झालं.
मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट देत त्यांनी विनोदी शैलीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
रवींद्र बेर्डे यांनी कमी वयात म्हणजे अवघ्या २० व्या वर्षी अभिनयाला सुरूवात केली.
सुरूवातीला रवींद्र बेर्डे नभोवाणी म्हणजेच रेडिओ क्षेत्रात काम करत होते.
२० वर्षे नभोवाणीत काम केल्यानंतर रवींद्र यांना नाटकांची आवड निर्माण झाली. १९६५ मध्ये रविंद्र यांनी नाटकामध्ये काम करण्यास सुरूवात केली.
रवींद्र बेर्डे यांनी ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना पोटधरून हसवलं.
आनाडी', 'खतरनाक', 'होऊन जाऊ दे', 'हमाल दे धमाल', 'चंगू मंगू', 'थरथराट', 'उचला रे उचला', 'गंमत जंमत', 'भुताची शाळा' हे रवींद्र बेर्डे यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्ये भाऊ आहेत.
रवींद्र बेर्डे यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.