Woman Fight Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Woman Fighting Viral Video: दिल्ली बसमध्ये सीटवरून दे दणादण; महिलेला खाली पाडून बेदम चोपलं; हाणामारीचा VIDEO व्हायरल

Fighting Viral Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोज अंतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच दिल्लीतील एका बसमधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Bus Fight Video

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोज अंतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी विविध पद्धतीच्या रेसीपीचे व्हिडिओ असतात तर कधी तूफान हाणामारीचे असतात. त्यातील बरेच व्हिडीओ दिल्ली मेट्रोशी तसंच बस संबंधित असतात. अशातच दिल्लीतील एका बसमधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओ एका सरकारी बसमधील आहे. याबसमध्ये महिला तसंच पुरूष प्रवासांची भरपूर गर्दी आहे. काही प्रवासी बसमधील सीटवर बसलेले आहेत तर काहीजण बसमधील मधल्या पॅसेजमध्ये उभे आहेत. परंतू या गर्दीत दोन महिलांची फक्त एका बसण्याच्या सीटवरून तूफान हाणामारी जुंपली आहे.

यात मेहंदी रंगाचा ड्रेस घातलेली महिला दुसरीला खाली पाडून जोरदार हाणतेय. खाली पडलेल्या महिलेचा तिने हात पकडून ठेवला असल्याने तिचा प्रतिकार करणे जमत नसल्याचे दिसत आहे. बसमधील इतर प्रवासी हाणामारी करत असलेल्या महिलेला थांबवण्याचे जराही प्रयत्न करताना दिसत नाही. व्हिडिओच्या शेवटला आपल्याला दिसते की, खाली पडलेल्या महिलेस कानाला गंभीर जखम झाली असल्याने तिच्या कानातून रक्त येत आहे.

हाणामारीचा व्हायरल व्हिडिओहा एक्स(ट्वीटर)वरील @gharkekaleshया पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ दिल्लीतील एका सरकारी बसमधला आहे. दिल्ली म्हटलं की कायमच आता लक्षात राहील ते मेट्रोमधील साजश्रृंगारातील तरुण, कधी जोडप्याचे किळसवाणे कृत्य आणि तरुणीचा विचित्र डान्स या गोष्टीमुळं दिल्लीला नवीन ओळख मिळाल्याशिवास राहणार नाही.

व्हायरल व्हिडिओला लाखोच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय. एका यूजरने लिहिलंय की,'ही आम्ही... ही आमची बस... आणि सीटच्या मागे भांडण चालू आहे' तसंच आणखी एका यूजरने लिहिलंय की,'दिल्ली कोणासाठीही सुरक्षित नाही मुंबई सर्वोत्तम आहे' अशा प्रकारच्या गमतीदार कमेंट्स व्हिडिओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT