Viral Bike Video  Saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: थरारक स्टंट! चक्क धावत्या बाईकवरून फटाके फोडण्याचं धाडस...तरुणाच्या आलं अंगलट ...VIDEO व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Bike Video

गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिवाळीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या धुमधडाक्यात दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यासाठी तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. अनेकदा फटाके फोडताना काही ठिकाणी हुल्लडबाजीचेही प्रकार घडतात. सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क धावत्या बाईकवर बसून फटाके फोडत असल्याचे दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. यात रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांचा बळी देखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तरुणाईवर याचा काहीही फरक पडताना दिसत नाही. मात्र व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने स्टंट करणारा तरुण चांगलाच अडणीत आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक तरुण सुरुवातीला बाईकच्या समोरील हेडलाईटच्या भागात काही फटाके लावताना दिसतोय, त्यानंतर दुसरा तरुण येऊन बाईकवर बसतो. बाईकवर बसल्यानंतर हिरव्या रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने फटाक्यांच्या वाती पेटवल्या. यानंतर हेल्मेट घातलेला तरुण येतो आणि बाईक जोरात चालवू लागतो. यात तो बाईकवरून स्टंटही करत आहे. स्टंट करताना बाईकला लावलेले फटाके एकापोठापाठ फूटत आहेत

सदर व्हिडीओ हा@Lollubee या एक्स (ट्वीटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ तमिळनाडूमधील त्रिची जिल्ह्यातील आहे. तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ कैद केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे धोकादायकरित्या फटाके वाजवून इतरांना त्रास देवू नका अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत. तर या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याचीही मागणी काही जणांनी केली आहे.दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीसही या तरुणांचा शोध घेत आहेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT