Danny Pandit Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Danny Pandit Viral Video: अथर्व सुदामेनंतर प्रसिद्ध इनफ्ल्युएन्सर डॅनी पंडितच्या रीलची चर्चा; नेटकरी म्हणाले, हा आहे माझा भारत देश

प्रसिद्ध इनफ्ल्युएन्सर डॅनी पंडितचा गणेशोत्सवातील रील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध इनफ्ल्युएन्सर अथर्व सुदामे हा गणेशोत्सवानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून त्याने हिंदू आणि मुस्लिम एकतेबाबत भाष्य केलं होतं. त्याचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला नाही. ज्यामुळे अथर्ववर टीका करण्यात आली. त्यानंतर तो व्हिडीओ डिलिट करण्यात आला. अशातच आता अथर्व सुदामेचा मित्र प्रसिद्ध सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सर डॅनी पंडित याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

डॅनी पंडीतचा व्हिडीओ नेमका काय आहे?

डॅनी पंडितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, डॅनी आणि त्याचे मित्र मैत्रिणी गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. आरती केल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेल्या झोया नावाच्या मुलीला तिची आई हाक मारते. मुलगी पळत आईकडे जाते. आणि थोड्याच वेळात हातात डिश घेऊन परत येते. डॅनी तिच्या हातातली डिश उघडतो तर त्यात गणपतीचा प्रसादासाठी बनवलेले उकडीचे मोदक असतात.

पुढे डॅनी मुलीला विचारतो, 'अपने बनाया? ज्यावर ती मुलगी म्हणते नही'. नंतर डॅनी विचारतो,'फिर किसने?' ती मुलगी म्हणते अम्मीने. यानंतर मुलीची अम्मी मागून येताना दिसत आहे. यानंतर सर्वजण मिळून झोयाच्या अम्मीने बनवलेले मोदक खातात. सोशल मीडियावर डॅनीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला त्याने 'बेस ऑन ट्रू इव्हेंट' असं कॅप्शन दिलं आहे. डॅनीच्या व्हिडीओ हजारो लाईक्स आणि कमेंट्स देखील आल्या आहेत. या व्हिडीओ वर एकाने, हा आहे माझा भारत देश, अभिमान तुझा असं म्हटलं आहे. तर एका युजरने, हा आहे माझा माणुसकीने जगण्याचा संदेश देणारा धर्मनिरपेक्ष भारत असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : भाजपचा पहिला आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

Manoj Jarange: आझाद मैदानावर जेवण बंद, शौचालयाला कुलूप; मनोज जरांगे भडकले, VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

Mega Block : ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार, रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक; पाहा वेळापत्रक

Ajit Pawar Slams Laxman Hake: विनाशकाले विपरीत बुद्धि! मी त्याला किंमत देत नाही; अजित पवार संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT