Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video : ताईचा नादच खुळा! गेस्ट स्टेजवरुन कोसळले तरी डान्स नाही थांबला

Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत,मात्र पुन्हा एकदा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, परंतू हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आज उत्सव देशभर साजरा केला जात आहे. अनेक कार्यालयात तर कुठे प्रत्येक शाळेत आज विविध कार्यक्रमांचे आजोयन केले जाते. या कार्यक्रमात अनेक ठिकाणी देशभक्ती गाण्यांवर शाळेतील विद्यार्थ्यांचे डान्स सादर होतात,त्यात एक आजच्या दिवशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक मुलगी १५ ऑगस्ट दिनानिमित्ताने डान्स करत आहे,मात्र नेमके काय झाले पुढे ते पुढे पाहाच.

सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral) होत असतात,त्यात कधी लग्नाच्या वरातीमधील अनेकांच्या डान्सचे व्हिडिओ असतात,तर कधी शाळेतील कार्यक्रमातील डान्सचे व्हिडिओ असतात,मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नेमके काय?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका १५ ऑगस्टच्या(Independence Day) कार्यक्रमातील कार्यक्रमातील दिसत आहे. या कार्यक्रमानिमित्ताने एक स्टेज आहे ज्या स्टेजवर एक मुलगी देशभक्ती गाण्यावर डान्स करत आहे. काही वेळात डान्स करताना तिच्यापाठी मागे असलेल्या खुर्चीवर काही व्यक्ती बसण्यासाठी येतात मात्र पुढे ही मुलगी नाचत असते पंरतू जे व्यक्ती खुर्चीवर बसण्यासाठी येतात त्यातील एक पुरुष अन् त्याच्या बाजूला बसलेली महिला अचानक स्टेजच्या खाली पडतात. यात गंमतीदार गोष्ट म्हणजे ती मुलगी ते खाली पडून सुद्धा डान्स करण शेवटपर्यंत थांबवत नाही.

पाहा व्हिडिओ

व्हिडिओ कुठे पाहता येईल?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील'@mumbai2maharashtra 'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूज शिवाय अनेक गंमतीदार प्रतिक्रिया (Response)आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT