Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मगर पकडण्यासाठी पुढे आला आणि त्याच तलावात पाय घासरुन पडला; पुढे जे घडलं ते भयंकरच

Crocodile Viral Video : व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती आपल्या हातामध्ये एक पक्कड घेऊन उभा आहे. समोर एका तवातात थोडं पाणी आणि एक मगर आहे. या मगरीला हा तरुण पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

Ruchika Jadhav

Crocodile Video :

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका व्यक्तीला मगर पकडणे चांगलंच महागात पडलं आहे. मगर पकडण्याच्या प्रयत्नात हा व्यक्ती मगर ज्या तलावात आहे त्याच तलावात पाय घसरून पडलाय. या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या सीसीटी कॅमेऱ्यात कैद केलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती आपल्या हातामध्ये एक पक्कड घेऊन उभा आहे. समोर एका तवातात थोडं पाणी आणि एक मगर आहे. या मगरीला हा तरुण पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मगर पकडण्यासाठी त्याच्याकडे असलेली लांब पक्कड तो पुढे सरकवतो. त्यामुळे मगर आपला जीव वाचवण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते.

तितक्यात तरुण मागे सरकतो. मागे सरकत असताना तो ज्या कठड्यावर उभा असतो तो भाग थोडा सरपटणारा असतो. त्यामुळे तरुणाचा पाय घसरतो आणि तो धाडकन पाण्यात पडतो. पाण्यात पडताच मगर त्याच्या दिशेने धाव घेते. आता या घटनेत पुढे काय घडतं ते समजू शकलेलं नाही. कारण व्हिडीओ इथपर्यंतच आहे.

मात्र व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीला पाहून असे समजते की, तो मगर पाळणारा असावा. त्याच्याजवळ असलेल्या मगरीला टो ट्रेनींग देत असावा. त्यामुळे त्याच्या आजुबाजूला अन्य काही व्यक्ती असतील त्यांनी या तरुणाला मृत्यूच्या दहाडेतून बाहेर काढले असेल. @flirting.lines या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांनी यावर लाइक्सचा वर्षाव केलाय तसेच विविध कमेंट देखील केल्या आहेत. काहींनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केलेत तर काहींनी मुक्या प्राण्यांना त्रास देणाऱ्यांसोबत असेच घडले पाहिजे असं देखील म्हटलं आहे. याचं तर मोये मोये झालं. कधी आम्ही कधी तुम्ही अशा कमेंट देखील काहींनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

SCROLL FOR NEXT