Snake Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Snake Viral Video: अरे बापरे! तरुणाच्या केसात अडकला साप; निघता निघेना.. थरकाप उडवणारा VIDEO

Gangappa Pujari

Snake Viral Video: साप म्हणलं की भल्या भल्यांची तारांबळ उडते. सापाशी पंगा घेणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच आहे. समोर साप पाहताच न घाबरणारी व्यक्ती सापडणे अशक्यच. पण यालाही काही अपवाद असतात बर का.

सध्या एका तरुणाचा असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक साप चक्क तरुणाच्या केसात अडकल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओने भल्या भल्यांची झोप उडवली आहे.

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकदा आपल्या अंगावर काटा उभा राहतो. या व्हिडिओंमध्ये असे काही प्रकार पाहायला मिळतात जे पाहून विश्वास ठेवणं कठीण होवून जातं. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक साप तरुणाच्या केसात अडकल्याचे दिसत आहे. कुरळ्या केसात साप असा काही अडकलायं ही तो काढताना तरुणाचीही चांगलीच पंचाईत झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. (Latest Marathi News)

या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक पांढरा साप तरुणाच्या केसात अडकल्याचे दिसत आहे. हा तरुण तो साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कुरळ्या केसांमुळे सापाला बाहेर काढणे त्याच्यासाठी चांगलेच कठीण झाले आहे. साप बघताच आपल्या सारख्यांची ततंरते, पण हा तरुण अगदी आरामात या सापाला हाताळत असल्याने नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.

सध्या लोकांमध्ये वेगवेगळे प्राणी पाळण्याची क्रेझ आहे. त्यामुळे हा सापही पाळलेला असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. पाळीव असला तरी हा साप पाहून मात्र अनेकांची भितीने घाबरगुंडी उडाली आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी हा साप पाळीव असल्याचे सांगितले आहे, तर काही जणांनी असे स्टंट करुन जीव धोक्यात न घालण्याचा सल्ला दिला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून ४७ हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. (New Viral Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT