Fataka Hairstyle Saam TV
व्हायरल न्यूज

Fataka Hairstyle: तायडीनं थेट केसांत लावले फटाके; दिवाळीनिमित्त अतरंगी फॅशनचा VIDEO व्हायरल

Crackers In Hair Viral Video: फटाक्यांची माळ तिने तिच्या केसांमध्ये माळलीये. यात केसाना सर्वात आधी तिने रॉकेट लावलेत.

Ruchika Jadhav

Fataka Hairstyle Video:

सध्या सर्वत्र दिवाळी आनंदाने साजरी होत आहे. प्रदूषणाची माहिती आणि सूचना वाचूनही अनेक जण दिवाळी फटाके फोडत साजरी करतायत. फटाके फोडतानाचे आजवर अनेक अतरंगी व्हिडीओ व्हायरल झालेत. आता देखील असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने दिवाळीसाठी सुंदर साडी नेसलीये. साडी नेसल्यानंतर साजश्रृंगार करत तिने केसांची वेणी घातलीये. वेणीमध्ये सर्वच मुली गजरा माळतात. किंवा काही फुलं माळतात. अलीकडे केसांमध्ये डायमंड ब्रोच देखील काही मुली लावत असतात.

फुलांच्या आणि चमकीच्या सहाय्याने बनवलेले बरेच ब्रोच आणि रेडीमेंट वेण्या बाजारात आहेत. आता या सगळ्यांनी बोर झालेल्या या तरुणीने थेट आपल्या वेणीमध्ये फटाके माळलेत.

फटाक्यांची माळ तिने तिच्या केसांमध्ये माळलीये. यात केसांत सर्वात आधी तिने रॉकेट लावलेत. त्यानंतर लवंगी बॉम्बची छोटी माळ लावली आहे. त्याखाली सुतळी बॉम्ब लावलेत. पुढे संपूर्ण वेणीवर भुईचक्र लावले आहे.

तरुणीने बनवलेली फटाक्यांची वेणी आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फॅशनवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, मला वाटलं या फटाक्यांना आता माचीस लावायचे आहे. आणखी एकाने लिहिलं की, आता हे जाळून टाका. जर कोणी खरंच आग लावली तर काय होईल? असंही एकाने म्हटलं आहे. @kamal_hairstylist_official या इंस्ट्राग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

Black Raisin Benefits: हिवाळ्यात फक्त आठवडाभर खा भिजवलेले काळे मनुके, शरीरात दिसतील जबरदस्त बदल

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

SCROLL FOR NEXT