Cow Kiss King Cobra Saam TV
व्हायरल न्यूज

Cow Kiss King Cobra: न घाबरता न डगमगता गायीने केलं किंग कोब्राला किस; थरारक VIDEO एकदा पाहाच

Ruchika Jadhav

Cow and king Cobra:

सोशल मीडियावर आजवर सापाचे बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत. अनेक जण सापाच्या दंशापेक्षा साप चावला या भीतीनेच दगावतात. तर काही अतरंगी माणसं या मुक्या प्राण्यांना त्रास देतात. मद्य पिऊन काही तरुण आपला साहसी खेळ दाखवताना सापांना कीस करण्याची जोखीम देखील उचलतात. आजवर माणसांनी सापाला कीस केलेलं तुम्ही हमखास पाहिलं असेल मात्र आता चक्क एका गायीने सापाला किस केलंय.

प्राण्यांना बोलता येत नसलं, त्यांना भाषा नसली तरी देखील त्यांना भावना आहेत. समोरच्या व्यक्तीमधील चांगला भाव त्यांना ओळखता येतो. कोण आपल्याला मारणार आहे तर कोणासोबत आपण सुरक्षित आहोत हे देखील मुक्या प्राण्यांना सहज समजते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असंच काहीसं चित्र दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किंग कोब्रा साप वाटेत फणा वासून बसला होता. समोरून येणाऱ्या गायीने हे पाहिलं. गाय पुढे आली तेव्हा तिच्या समोर साप फणा काढून बसला होता. सापाच्या एका दंशाने सुद्धा गायीला आपला जीव गमवावा लागला असता. मात्र गाय सापाला आपल्या वाटेतून बाजूला करण्यासाठी किंवा आपला बचाव करण्यासाठी तेथून पळ काढत नाही.

ती सापावर माया करते आणि प्रेमाणे सापाला कीस करते. एक गाय आपल्या जिभेने चक्क किंग कोब्रा सापावर प्रेम करत आहे. गाय आणि किंग कोब्राचं हे दृश्य IFS सुशांत नंदा यांनी आपल्या फोनमध्ये कैद केलंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, व्हिडीओतील दृश्य स्पष्ट करणे कठीण आहे. हा निखळ प्रेमातून मिळालेला विश्वास आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्यात. गायीने दाखवलेली माया सगळं काही जिंकू शकते अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीये. तर प्रेमाने कितीही कडक स्वभावाच्या व्यक्तीला देखील शांत करता येतं, असं एकाने लिहिलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT