Cow Bike Riding Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Priya More

सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांप्रमाणे प्राणी देखील खूप हुशार असतात. प्राण्यांचे काही व्हिडीओ असे असतात की त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. सध्या सोशल मीडियावर एका गायीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आतापर्यंत तुम्ही कुत्रा, मांजरने बाईक राईड केल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण आता चक्क एका गायीने बाईक राइड केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण गायीला बाईकच्या टाकीवर बसवून रायडिंग करताना दिसत आहे. हा तरुण सुसाट गाडी चालवत आहे. एका कारमधून जाणाऱ्या व्यक्तीने गायीची बाईक रायडिंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणाची कमाल आहे. ऐवढ्या भल्या मोठ्या गायीला बाईकवर बसवून तो रायडिंग करण्याचा आनंद घेत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आपल्या डोक्यालाच हात लावला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘drelishagoldstein’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर २३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ लाखांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'अशापद्धतीने काउ बॉय बनतो.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'मला खूप आवडले की गायने तरुणाकडे असे पाहिले की आपल्या कामाशी काम ठेव.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT