Delhi Metro Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Couple Fight In Delhi Metro : गर्लफ्रेंडचा राग अनावर, भर मेट्रोत सर्वांसमोर बॉयफ्रेंडचं थोबाड फोडलं; VIDEO व्हायरल

Latest Viral News: हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Priya More

Delhi Metro News: दिल्ली मेट्रो (Delhi Metro) ही सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत असते. दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोत कधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड रोमान्स करताना दिसतात, तर कधी किस करताना दिसतात. आता तर दिल्ली मेट्रोमध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला सर्व प्रवाशांसमोर धूधू धूतले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दिल्ली मेट्रो प्रवाशांनी खचाखच भरली आहे. ब्लू लाईन स्थानकाजवळ मेट्रो पोहचते. त्यावेळी मेट्रोतील दरवाजाच्या समोरच उभं राहून गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची शाब्दिक बाचाबची सुरु असल्याचे दिसत आहे. गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला जाब विचारताना दिसत आहे. बॉयफ्रेंड मात्र काहीच बोलत नाही. त्यामुळे गर्लफ्रेंडचा राग अनावर होतो आणि ती आपल्या बॉयफ्रेंडच्या कानशिलात लगावते.

गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची जोरजोरात भांडण सुरु आहे तरी देखील इतर प्रवासी हे आपल्याच नादामध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोतील शांततेमध्ये या तरुणीचा मोठा आवाज व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे. तिचा बिचारा बॉयफ्रेंड मात्र तिला एकही शब्द बोलताना दिसत नाहीये. या कपलचे हे भांडण पाहून मेट्रोतील काही प्रवासी फक्त मजा घेत होते पण कोणीच त्यांचे भांडण सोडवले नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नेटिझन्स देखील या व्हिडिओवर कमेंट्स करत आपले मत व्यक्त करत आहे. अनेकांनी या तरुणाचे कौतुक केले आहे कारण तो एकही शब्द बोलत नाहीये. एकाने कमेंट करत असे लिहिले की, 'जर एखाद्या पुरुषाने तरुणीला मारले असेल तर मेट्रोमधील प्रत्येकजण महिलेच्या मदतीसाठी पुढे आला असता. येथे तरुणी मारतेय आणि प्रत्येकाला वाटते की पुरुषांनी काहीतरी चुकीचे केले आहे. दोन्ही बाबतीत पुरुष चुकीचे आहेत.' व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला १० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

SCROLL FOR NEXT