Cobra Snake In Helmet Saam TV
व्हायरल न्यूज

Cobra Snake In Helmet: हेल्मेटमध्ये फणा काढून बसला किंग कोब्रा; नजर चुकली अन्...पुढे जे घडलं ते भयंकरच

Cobra Viral Video: साप येथे असेल असं कुणाच्याही पटकन लक्षात येत नाही त्यामुळे मोठा अनर्थ घडतो. अशात सोशल मीडियावर थेट हेल्मेटमध्ये साप असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

जंगल परिसरात घर असल्यास साप, सरडे किंवा अन्य हिंस्र प्राणी घराजळ येण्याची शक्यता असते. अनेकवेळा मानवी वस्ती असलेल्या परिसरात साप, अजगर आढळल्याच्या घटना घडतात. बऱ्याचदा घराबाहबेर असलेल्या वस्तुंमध्ये साप किंवा काही किटक जाऊन बसतात. साप येथे असेल असं कुणाच्याही पटकन लक्षात येत नाही त्यामुळे मोठा अनर्थ घडतो. अशात सोशल मीडियावर थेट हेल्मेटमध्ये साप असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणाच्या हेल्मेटमध्ये किंग कोब्रा साप जाऊन बसला आहे. हा साप हेल्मेटमधून फना बाहेर काढून पाहतोय. किंग कोब्राचा हा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करताना साप त्या व्यक्तींला दंश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

तरुणाने आपल्यासोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडिया उकाउंटवर पोस्ट केला आहे. @Dev Shrestha या इन्सटाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर अनेक मजेशीर कमेंट्स देखील आल्यात. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, किंग कोब्राला दुचाकी चालवायची असणार त्यामुळे त्याने हेल्मेट घातलं आहे.

तरुणाच्या या इन्स्टाग्राम अकाउंटवर सापाचे अनेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेत. यातील एका व्हिडीओत अजगर गरुडाची शिकार करत आहे. हवेत झाडाला लटकलेल्या अजगराने ही शिकार केलीये. या थरारक व्हिडीओवर देखील नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्यात. यासह माकड आणि सापाचे देखील असे अनेक व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेत.

सापाचे (Snake) आजवर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. साप म्हटलं की सर्वांच्याच काळजात धडकी भरते. मात्र सर्पमित्र जिवाची पर्वा न करता सापांंना जीवनदान देतात. सापांना पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडतात. कही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक महिला घराच्या स्लॅबमध्ये असलेल्या दोन सापांना पकडत होती. सर्पमित्र असलेल्या या महिलेच्या व्हिडीओवरही नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

SCROLL FOR NEXT