Viral Stunt Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Stunt Video: बापरे! धावत्या कारवर बसून मद्यपान; तरुणाच्या जीवघेणी स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर अनेक भयानक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात पुन्हा एकदा संभाजी नगरमधील दोन स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धुळे सोलापूर महामार्गावर कारच्या खिडकीतून बाहेर निघून एक तरुण दारू पीत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार वेगात असतानाही असा स्टंट करणाऱ्या या व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अशा वागण्यामुळे मोठे अपघात होण्याती शक्यता असतो. सध्या या व्हायरल होत असलेल्या तरुणावर पोलीस कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित केला जात असून अशा लोकांमुळे निष्पाप लोकांचे बळी जातात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण व्हिडिओचा कालावधी रात्रीच्या वेळीतील आहे. या वेळी महामार्गावर अनेक मोठी अवजड वाहने जात आहेत. त्यात तुम्हाला सफेद रंगाची धावती कार दिसते. याच कारमध्ये एक तरुण कारच्या खिडकीतून बाहेर निघालेला दिसत आहे. मात्र याच धावत्या सफेद रंगाच्या कारमध्ये असलेला तरुण चक्क दारु पित असल्याचे दिसत आहे. कारचे स्पीडही जास्त असल्याने अपघात होण्याची शक्यताही होती.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ धुळे(dhule) सोलापूर महामार्गावर गांधिले फाट्याजवळील आहे. याच महामार्गावरुन जाणाऱ्या एका प्रवाशाने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केलाय. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @mrbeen या अकाऊंटवर शेअर केला आहे. मात्र यानंतर पोलिस या स्टंट केलेल्या या तरुणांवर कारवाई कधी करतील हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दारुड्यांचे दोन व्हिडिओ संभाजीनगरमध्ये व्हायरल

संभाजी नगरमधून हा व्हिडिओ व्हायरल होताच असाच एक व्हिडिओ धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. ज्यात रस्त्यांवर जाणारा दुचाकीचालक दारूच्या नशेत असलेला दिसून येतोय मात्र याच नशेत तो ळे सोलापूर महामार्गावरून दुचाकी(bike) चालवत आहे. यात तो कोणतेही भान नसताना तो गाडी चालवत होता. यामुळे त्याचा अपघात होण्याचीही शक्यता होती शिवाय दुसऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - भुसावळमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ; पोलिसांची रात्री वाहन तपासणी

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT