CCTV Footage Saam TV
व्हायरल न्यूज

CCTV Footage: खेळता-खेळता भरधाव कारसमोर आली चिमुकली अन्...; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Car Accident: मुलीने मागे फिरल्यावर कार थेट समोर असलेल्या दुसऱ्या एक कारवर आदळते. यावेळी कारच्या पुढील भागाचा पूर्णता चक्काचूर होतो. कारची अवस्थापाहून तुमच्याही लक्षात येईल की, चिमुकली किती मोठ्या अपघातापासून वाचली आहे.

Ruchika Jadhav

Car Accident Viral Video:

लहान बाळ जन्माला येतं तेव्हाचं त्याचं नशिब लिहिलं जातं, असं म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढं त्यांना जगावच लागतं. तर काही व्यक्तींना अनपेक्षितपणे मृत्यू ओढावतो. अशात सोशल मीडियावर असाच एक चकित करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

अनेक साध्या आणि शुल्लक अपघातांमध्ये व्यक्तीचा मृत्यू होत असतो. मात्र काळ आसा होता आणि वेळ नाही, या म्हणीची प्रचिती व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून समोर आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान चिमुकली खेळता खेळता बाहेर रस्त्यावर आलीये.

खेळता खेळता ती बाहेर आली तरी तिच्याकडे कुणाचही लक्ष जात नाही. चिमुकली रस्त्यावरून पुढे जात असते. तितक्यात समोरून एक कार भरधाव वेगात समोर येते. कार पाहून चिमुकली टर्न होते आणि... सुखरुप वाचते. मागे पुन्हा फिरल्याने कार तिला अगदी खेटून गेली असली तरी तिला कोणतीही दुखापत होत माही.

मुलीने मागे फिरल्यावर कार थेट समोर असलेल्या दुसऱ्या एक कारवर आदळते. यावेळी कारच्या पुढील भागाचा पूर्णता चक्काचूर होतो. कारची अवस्थापाहून तुमच्याही लक्षात येईल की, चिमुकली किती मोठ्या अपघातापासून वाचली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शन लिहिलंय.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट केल्यात. यमराज 2 सेकंद लेट झाला असं एकाने कमेंटमध्ये म्हटलंय. तर आणखी एकाने गाडी चालकाचे आभार आहेत. तर आणखी एका व्यक्तीने बारक्या मुलाच्या आई बापाकडून नुकसानभरपाई घेतली पाहिजे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. @viralinmaharashtra या इंन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT