टॅक्सीमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हरची परवानगी न घेता सिगारेट ओढणाऱ्या एका प्रवाशाला कॅब चालकाने गाडीतून खाली उतरवल्याचा प्रकार घडलाय. इतकंच नाही तर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या घटनेनंतर अनेकांनी चालकाच्या निर्णयाचं कौतुक केलं असून कॅबमधून प्रवास करताना इतरांचा आदर आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणं गरजेचं असल्याची चर्चा सुरू झालीये.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कॅब चालक आणि प्रवाशामध्ये झालेला वाद तुम्ही पाहू शकता. प्रवाशाने टॅक्सीमध्ये सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्यानंतर ड्राव्हरने त्याला विरोध केला. मात्र प्रवाशाने ड्रायव्हरची परवानगी घेण्याची गरज नसल्याचं सांगत त्याची बाजू मांडली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढला.
हा व्हिडिओ अनेक यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केला आहे. या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया देत कॅब चालकाचं समर्थन केलंय एका यूजरने पोस्ट करत लिहिलंय, "टॅक्सीत सिगारेट ओढायला सुरुवात करणाऱ्या ग्राहकाला बाहेर काढणाऱ्या या कॅब चालकाचं मी कौतुक करतो."
या व्हिडिओमुळे टॅक्सी किंवा कॅबमध्ये प्रवास करताना पाळायच्या साध्या नियमांवर आणि ड्रायव्हरच्या सन्मानावर चर्चा सुरू झाली. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी सांगितलं की, कोणतीही अशी कृती करण्यापूर्वी प्रवाशांनी चालकाची परवानगी घेणं गरजेचं आहे. कारण त्याचा परिणाम वाहनातील इतर व्यक्तींवर आणि गाडीवर होऊ शकतो.
प्रवाशाने चालकाचा विरोध मान्य करण्यास नकार दिल्यानंतर हा वाद आणखी वाढला. त्यावेळी चालकाने प्रवास सुरू ठेवण्याऐवजी थेट राइड थांबवण्याचा निर्णय घेतला आणि प्रवाशाला टॅक्सीतून बाहेर जाण्यास सांगितलं. वादाच्या वेळी ड्रायव्हरने ठामपणे सांगितले, "मी टॅक्सी ड्रायव्हर आहे, तुमचा नोकर नाही."
दरम्यान ड्रायव्हरचे हे शब्द सोशल मीडियावर अनेकांना भावले. अनेकांनी त्याच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीचं कौतुक केलंय.
हा व्हिडिओ आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्यात. बहुतांश यूजर्सनी ड्रायव्हरने घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करत प्रवासादरम्यान नियम आणि परस्पर आदर राखणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.