Bride Entry Dance Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरी जोमात..., 'कान्हा कान्हा' या गाण्यावर नवरीची रॉकींग एन्ट्री; डान्स पाहून नवरदेव पाहतच राहिला

Bride Entry Dance Video Viral: सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो.या लग्नसोहळ्यात वर- वधूची एन्ट्री ही हटके असते. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

लग्नामध्ये हळदीत तसेच नवरा- नवरीची एन्ट्री होताना नातेवाईक, मित्रमैत्रिणींना डान्स करताना तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र स्वत:नवरी डान्स करताना तुम्ही कधी पाहिलेय का? असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी डान्स करताना दिसते आहे.

प्रत्येकाला स्वताच्या लग्नात (Wedding) काहीतरी हटके स्टाईल करायची असते. सोशल मीडियावर देखील हे व्हिडीओ आपल्याला दिसतात. आता देखील एका नवरीने कारच्या सनरूफवर डान्स करत मंडपात एन्ट्री केली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका नवरीने कारच्या छतावर फुल एक्सप्रेशन देत डान्स केला आहे. नवरी आकाशी रंगाच्या साडीत गॉगल लावून 'तुझी थट्टा तुझी मस्करी' या गवळणीवर डान्स करताना दिसते.नवरीचा हा हटके स्वॅग पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

उत्साही नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फेसबुक अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून सदर व्हिडिओला नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर हॉर्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आहे तर काहींनी नवरीच्या स्वॅगचे कौतुक केले आहे.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT