Bride Anaconda Dance Saam TV
व्हायरल न्यूज

Bride Anaconda Dance: नागिन डान्सला टक्कर द्यायला आला अजगर डान्स; भर मंडपात नवरी अजगरासारखी नाचली, VIDEO व्हायरल

Bride Anaconda Dance Video Viral: व्हायरल व्हिडीओमध्ये नाचणारी ही महिला भरपूर जाड आहे. तिचं वजन इतकं जास्त आहे की खाली बसल्यावर तिला वरती उठता सुद्धा येत नाही.

Ruchika Jadhav

Viral Video:

लग्न, हळद यांसह विविध कार्यक्रमांत आणि पार्टीमध्ये नाचून धिंगाणा घालताना नागिन गाणं हमखास वाजवलं जातं. अनेक तरुण, तरुणी या गाण्यावर जबरदस्त ठेका धरून डान्स करतात. बॉलिवूडमध्ये मै नागिन तू सपेरा या गाण्यावर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी भन्नाट डान्स केला होता. त्यांच्या डान्समुळे हे गाणं आणि नागिण म्हटल्यावर अभिनेत्रीसारखी एक सुंदर मुलगी डोळ्यांसमोर उभी राहते. अशात सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला नागिन गाण्यावर डान्स करत आहे. नागिन गाण्यावर तिने जबरदस्त ठेका धरलाय. खरंतर सडपातळ म्हणजेच मध्यम किंवा बारीक बांध्याच्या मुली या गाण्यावर नाचताना सुंदर वाटतात. मात्र, व्हायरल व्हिडीओमध्ये नाचणारी ही महिला भरपूर जाड आहे. तिचं वजन इतकं जास्त आहे की खाली बसल्यावर तिला वरती उठता सुद्धा येत नाही. मात्र हौस मोठी असते असं म्हणतात ना! तसंच काहीसं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

व्हायरल (Viral) व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, हा व्हिडीओ लग्नातील आहे. लग्नात वधू आणि वर दोघेही स्पेशल असतात. आपल्या लग्नात अनेक वधू आणि वर डान्स देखील करतात. असाच डान्स या महिलेने देखील करण्याचा निर्णय घेतला. मात्र साजेल तेवढं सजावं या म्हणीचा अर्थ इथे कळतो.

कारण प्रचंड जाड शरीर असूनही महिला आपल्या लग्नात थेट खाली झोपून डान्स करत आहे. नागिन गाण्यावर डान्स (Dance) करतानाचा तिचा हा व्हिडीओ @ankitupadhyay.88 या अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत यावर कमेंटमध्ये आणि कॅप्शनमध्ये लिहिलं नागिन डान्सनंतर सादर आहे अजगर डान्स. हा तर खात्या पित्या घरातला नागिन डान्स वाटतोय. या नागिनला बासरीने सावरने कठीणचं आहे, असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलंय. |

इन्स्टाग्रामवर ५ दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओपाहून अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी पाठवलेत. एकानेतर या महिलेला एनाकोंडा असं देखील कमेंटमध्ये लिहिलंय. आतापर्यंत या व्हिडीओला ७२ हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT