व्हायरल न्यूज

Viral Video: जीव धोक्यात घालून महिलेने दरोडेखोरांना शिकवला धडा, थेट ऑटोरिक्षाला लटकली...

Viral Video: फिल्लौर-लुधियाना महामार्गावर चोरीची घटना घडली. धाडसी महिलेनं दरोडेखोरांना चांगलाच धडा शिकवला. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

Manasvi Choudhary

प्रवास करताना चोरीच्या घटना या घडत असतात. अनेकदा हे दरोडेखोर महिलांचा पाठलाग करत त्याच्याकडील वस्तूंची चोरी करतात. अशा अनेक घटना समोर येतात. सोशल मीडियावर सध्या असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिलेच्या धाडसाने दोन दरोडेखोरांचा चोरीचा डाव फसला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला ऑटो रिक्षाला लटकलेली दिसत आहे. दोन दरोडेखोर चोरी करून पळताना महिलेने त्यांना अडवलं आहे. या महिलेने स्वत:चा जीव धोक्यात घालून दरोडेखोरांना चांगलाच चपराक दिला आहे.

फिल्लौर-लुधियाना महामार्गावर ही घटना घडली आहे. भरधाव वेगात ऑटो रिक्षामधून चोर चोरी करत पळ काढत आहेत. दरम्यान महिलेच्या लक्षात येताच महिलेने त्यांना थांबवले. मात्र दरोडेखोरांनी ऑटोरिक्षेने धूम ठोकली आहे. महिला देखील शांत राहिली नाही. ही महिला ऑटो रिक्षाचा पाठलाग केला आहे परिणामी महिला ऑटोरिक्षाला लटकली तरी देखील हे दरोडेखोर थांबत नव्हते. ही महिला जीव धोक्यात घालून, मोठमोठ्याने ओरडत होती. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना सावध करत होती.

सोशल मीडियावर या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटलं आहे की, देवी शक्तीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. तर आणखी एकाने, वाह! काय धाडस!त्या महिलेने दरोड्याच्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी अद्भुत धाडस दाखवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT