Boy Death After Fell From Building Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फोनवर बोलणं जीवावर बेतलं! उंच बिल्डिंगवरुन पडून तरुणाचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Viral Video: हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Priya More

Boy Death After Fell From Building: मोबाइल (Mobile) हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे. मोबाइलशिवाय आपली बरीच कामं पूर्ण होत नाहीत. आजकाल अनेकांना मोबाइलचे इतके वेड लागले आहे की, आपण कुठे आहोत, आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हेच त्यांना कळत नाही. बऱ्याचदा हा मोबाइलच आपल्या जीवावर बेतल्याच्या बातम्या आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत.

कधी वाहन चालवताना अनेक जण मोबाइलवर बोलतात, तर कधी रस्त्यावरुन मोबाइलवर बोलत जाताना अपघात झाल्याच्या देखील घटना आपण ऐकल्या असतील. अशामध्ये मोबाइलवर बोलताना एक तरुण उंच इमारतीवरुन खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती उंच इमारतीवर उभं राहून फोनवर बोलत आहे. अचानक या व्यक्तीचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. सुरुवातील या व्यक्तीच्या हातातील मोबाइल खाली पडताना दिसतो. त्यानंतर ही व्यक्ती खाली पडताना दिसत आहे. ही व्यक्ती स्वत:चा जीव वाचण्यासाठी छताला इकडे तिकडे पकडण्याचा प्रयत्न करते. पण या प्रयत्नात ही व्यक्ती अपयशी ठरते. अखेर बिल्डिंगवरुन खाली पडून या व्यक्तीचा मृत्यू होतो.

ही घटना समोरच्या इमारतीमध्ये असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @1000waystod1e नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५.३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा

यंदा 'फादर्स डे' कधी आहे? वडिलांना खूश करणाऱ्या 3 बेस्ट आयडिया

Diabetes: औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज 15 मिनिटं करा हे रुटीन फॉलो, लगेचच मिळेल आराम

Pravin Tarde: 'एका बॉलिवूड स्टारचं नाव घेताच सगळ्यांच्या लेखण्या सरसावल्या...'; प्रवीण तरडेंचा मराठी लेखक-दिग्दर्शकांवर संताप

नॉट रिचेबल ओमराजे निंबाळकरांचं लोकशन सापडलं; महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT