Black Turmeric Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Black Turmeric Viral Video : काळ्या हळदीने उघडतं बंद कुलूप? काळ्या जादूसाठी कोट्यवधींची डील? व्हायरल Video मागचं सत्य काय?

Special Report : काळ्या हळदीने बंद कुलूप उघडतं असा एक Video सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या काळ्या जादूसाठी कोट्यवधींची डील होत असल्याचं समोर आलं आहे.

मयुरेश कडव

काळ्या जादूचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र काळ्या हळदीमुळे बंद कुलूप उघडत असल्याचं कधी पाहिलंय का? काळ्या हळदीमुळे चमत्कार होत असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय. साम टीव्हीनं या व्हिडिओची पडताळणी केली, त्यामागचं सत्य शोधून काढलं..तुम्हाला तुमची फसवणूक टाळायची असेल तर ही बातमी आवर्जून पाहा...

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय आणि या व्हिडीओद्वारे अंधश्रद्धा पसरवली जातीय. लोकांची अक्षरश: लूट केली जातीय. या व्हिडीओत केळीच्या पानात काळी हळद ठेवलेली दिसते. या हळदीजवळ बंद कुलूप नेताच ते उघडतं. हळदीत ठेवलेली दाभण वाकडी होते. इतकच नाही तर कापूरही पेटून उठतो..हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी सोबत आपला मोबाईल नंबरही देऊ केलाय.

तसच हा व्हिडीओ कोणत्या तारखेचा आहे त्याची चिठ्ठीही लिहून ठेवलीय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियात अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. खरंच काळी हळद इतकी पॉवरफुल्ल आहे का? काळ्या हळदीत असं काय आहे ज्यामुळे चक्क कुलूप उघडलं जातं. साम टीव्हीनं या व्हिडीओचं सत्य उलगडण्यासाठी पडताळणी केली. हा विषय काळ्या जादूशी निगडीत असल्यानं आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा.

व्हायरल सत्य

याचाच अर्थ काळ्या हळदीनं कुठलंही कुलूप उघडत नाही. काळ्या हळदीने कुलूप उघडलं गेलं असतं तर चोरट्यांनी बँकमध्ये चोरी करण्यासाठी काळी हळद वापरली असतील. पोलिसांना तपास करणं कठीण झालं असतं. ट्रीक वापरून हा व्हिडीओ बनवण्यात आलाय. काळी जादू करणारे समाजकंटक असे व्हिडीओ दाखवून लोकांची दिशाभूल करतायेत. काळ्या जादूच्या नावावर कोट्यवधींची डील करून त्यांची फसवणूक केली जातेय. काळी हळद जादूटोण्यासाठी नव्हे तर आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे उपचारासांठी उपयुक्त आहे.

त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडीओत करण्यात आलेला दावा असत्य ठरलाय. काळ्या हळदीमुळे कोणतंही बंद कुलूप उघडत नाही. तसच लोखंडही वाकत नाही नाही. तरीही काळ्या जादूच्या नावावर असे व्हिडीओ दाखवून लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातोय. तुम्ही अशा व्हिडीओवर विश्वास ठेऊन काळ्या जादूच्या नादाला लागू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT