Bihar man ties knot with his mother-in-law  
व्हायरल न्यूज

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

Bihar Wedding News : सासू आणि जावईचं प्रेम प्रकरण सासऱ्याला समजल्यानंतर त्यांनी मोठं निर्णय घेत आपल्या पत्नीचं जावयाशी लग्न लावून दिलं. ही घटना बिहारमध्ये घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bihar man ties knot with his mother-in-law :

बिहार राज्यातील बंका जिल्ह्यात विचित्र प्रकार घडल्याच समोर आलंय. एका गावतील एका व्यक्तीने आपल्या बायकोचं थेट जावयासोबत लग्न लावल्याची घटना घडलीय. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालाय. जावयासोबत बायकोला सात फेरे घेण्यास सांगितल्याने तेथील उपस्थित लोकांच्या भुवया उंचावल्यात. नेमकं काय आहे, प्रकरण जाणून घेऊया.

बंका जिल्ह्यातील छत्रपाल पंचायतीच्या हिरमोती गावातील रहिवाशी सिकंदर यादव वय वर्ष ४५ हे आपल्या पत्नीच्या निधनानंतर सासू-सासऱ्याकडे राहत होते. त्या काळात त्याची सासू गीता देवी वय ५५ यांच्यावर त्यांचे प्रेम जडलं. हे दोघेही लपून छपून प्रेम रंगात रंगत असायचे. या दोघांच्या प्रेमाची कुणकूण सासऱ्याला लागली. जावई आणि पत्नीचं प्रेम प्रकरण समजल्यानंतर त्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडण्याचं ठरवलं. तसा त्यांनी साफळा रचत या दोघांना रंगेहात पकडलं. त्यानंतर संतापलेल्या सासऱ्याने एक मोठं पाऊल उचललं.

हिरमोती गावातील रहिवासी दिलेश्वर दरवे यांनी कटोरिया ब्लॉकमधील धोबनी या गावातील सिकंदर यादव यांच्याशी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांची पहिली पत्नी मरण पावली. त्यानंतर सिकंदरने दुसरं लग्न केलं पण तेही लग्न यशस्वी ठरले नाही. सिकंदरने दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला. दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर सिकंदर पहिल्या पत्नीच्या घरी येत राहिला. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती.

दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट झाल्याने सिकंदरचे आयुष्य एकाकी झाले होते. दरम्यान तो त्याची ५५ वर्षीय सासू गीता देवी यांच्याशी फोनवर बोलत राहिला. या संवादाचे रुपांतर प्रेमात झालं. जावई आणि सासू यांच्यातील प्रेमसंबंध वाढू लागले. दरम्यान सिकंदरच्या सासऱ्यांना जावई आणि त्यांच्या बायकोच्या प्रेम प्रकरण समजले. दोघांची पोलखोल झाल्याने सासऱ्याने त्या दोघांना गावातील पंचायतीसमोर आणलं. पंचायतनं दोघांकडून कबुली जबाब घेतला. त्यावेळी जवायानं त्याचं सासूवर प्रेम असल्याचं कबूल केलं. त्यानंतर या दोघांचं सर्व गावकऱ्यांसमोर लग्न लावून देण्यात आले. या विचित्र लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिकंदर आपल्या सासूच्या भांगेत कुंकू लावताना दिसत आहे.

याप्रकरणी सासरे दरवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, त्यांनी स्वखुशीने या लग्नाला परवानगी दिली. गावकऱ्यांसमोरच जावई आणि सासूचे लग्न पार लावून देण्यात आलं. त्यानंतर त्या दोघांच्या रजिस्टर विवाहासाठी सासऱ्यांनीच पुढाकार घेतल्याचं म्हटलं जात आहे. एक्सवर एनपी हिंदी या हँडलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. त्यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT