Bihar News  Google
व्हायरल न्यूज

Bihar Viral News: लग्नानंतर २ महिन्यातच पत्नीचं बिंग फुटलं, नवऱ्याने रंगेहात पकडले, पुढे जे झालं ते...

Bihar News: कोडरमा जिल्ह्यातील तिलैया पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या गावात एक धक्कादायक घटना घडलीय. नवऱ्याने आपल्या बायकोची पोलिसात तक्रार केलीय. का केली तक्रार? नेमकं काय आहे कारण? हे जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्नाचं बंधन सात जन्माचं बंधन मानले जातं. सात जन्मापर्यंत हे बंधन तुटत नाही, पण कोडरमा येथील एका व्यक्तीला अवघ्या दोन महिन्यातच हे बंधन तोडण्याची वेळ आलीय. पत्नीच्या सवयीमुळे या व्यक्तीला दोन महिन्यातच नातं तोडण्याची वेळ आलीय. विशेष म्हणजे त्याने थेट पोलिसात न्यायाची दाद मागितली आहे. मोहम्मद एजाज असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून तिच्याविरोधात तिलैया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

काय आहे प्रकरण?

मोहम्मद एजाजचं ८ मे २०२४मध्येल चंपारण येथील महिलेसोबत लग्न झालं होतं. हे लग्न मुस्लीम रितीरिवाजांनुसार झालं होतं. मात्र लग्नानंतर सुमारे दोन महिन्यांनी घरची सून होण्यासाठी सासरच्यांनी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. सासरकडच्या लोकांचे ऐकलं नाही म्हणून त्याच्या पत्नीच्या स्वभावात मोठा बदल झाला. तिने कधीच वैवाहिक संबंध प्रस्थापित केले नाहीत.

मोहम्मद एजाज पुढे पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी नेहमी मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असायची. ही बाब एजाजच्या निर्दशनात आली. त्याला पत्नीची शंका आल्यानंतर त्याने पत्नीचा मोबाईल चेक केला. त्यात त्याला त्याच्या पत्नीची चॅटिग दिसली. एजाजची पत्नी तिच्या दाजीसोबत अश्लील चॅटिंग करत असल्याचं दिसून आलं.

एजाज आणि त्याच्या पत्नीमधील वाद वाढल्यानंतर एजाजच्या सासरच्यांनी पंजायतीसमोर हा विषय नेला. हे प्रकरण मिटवण्यासाठी पंचायतींच्या पंचांनी त्याच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. मग जेव्हा हे प्रकरण पंचायतीत सुटलं नाही तेव्हा हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. एजाजने सांगितले की, पत्नीचा छळ आणि मेव्हण्यासोबतच्या संबंधांमुळे तो खूप तणावाखाली आहे. न्याय न मिळाल्यास आपण आत्महत्या करू असं एजाजने पोलिसांना सांगितलंयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT