Bihar Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Bihar Viral Video : कॉपी करताना रोखल्याने संतापली महिला;शिक्षकालच चापटी मारत धू धू धुतलं, पाहा VIDEO

Viral Video : व्हिडीओत एक महिला शिक्षकास मारहाण करत असल्याचं दिसत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Teacher Student Fight Viral Video

सोशल मीडियावर नागरिकांनी आपलं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे. इथं एखादा फोटो किंवा व्हिडीओ क्षणात व्हायरल होतो. सोशल मीडियाच्या जगात अनेक धक्कादायक आणि गंमतीदार व्हिडीओ पाहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक महिला शिक्षकास मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसते की, हा व्हिडीओ एका परीक्षा हॉलमधील आहे. त्यात एक सफेद कुर्ता घातलेली महिला गुलाबी रगांचा टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीला मारहाण करत आहे. त्यात व्यक्तीचे कपडेही फाडल्याचे दिसत आहे. यानतंर तिनं त्या व्यक्तीला चापटही मारलीय. व्हिडीओतील व्यक्ती तिला विरोध करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तसंच हॉलमधील इतर लोक तिला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणाचं ऐकण्याच्या स्थितीत नाहीये.

नेमंक काय घडल...?

हा व्हिडीओ बिहारमधील भागलपुरचा आहे. भागलपूर विद्यापीठात कायद्याच्या पदवीसाठी परीक्षा सुरू होती. परीक्षेच्या दरम्यान या महिलेला शिक्षकानं कॉपी करताना पकड्याने तिने गोंधळ सुरू केला. त्यानतंर शिक्षकाला मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. इतकेच नव्हे तर सुरक्षारक्षक तिला थांबवण्यासाठी आले असता महिलेने त्यांना देखील चापट मारली. परंतु स्वात:ची चूक मान्य न करता महिलेने पोलिसांशी बाचाबाचीही केली.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. गुरूचं स्थान सर्वांच्या आयुष्यात खूप महत्वाचे असते. परंतू शिक्षकांना होणारे हे प्रकार थांबायचं नाव घेत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plastic surgery : कॅन्सरमुळे तरुणानं लिंग गमावलं, ८ वर्षांनी प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना, साडे ९ तास चाललं ऑपरेशन

What not to ask ChatGPT: चुकूनही ChatGPT ला विचारू नका या गोष्टी; फायदा सोडून नुकसान होईल

GK: भारतात सूर्य सर्वात आधी मावळतो कोणत्या गावात मावळतो?

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

SCROLL FOR NEXT