sonali patil  Saam tv
व्हायरल न्यूज

Sonali Patil Dance : लव्ह कराव वाटतंय गं आता म्हातारपणात; बिग बॉस फेम अभिनेत्रीचा रील व्हायरल, VIDEO

Sonali Patil Dance video : बिग बॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटीलचा रील सध्या चर्चेत आलाय. सोनाली पाटीलच्या रीलला शेकडो चाहत्यांनी लाईक्स दिले आहे. तिच्या या रीलची जोरदार चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

चमुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. रीलस्टारसोबत मराठी कलाकार आणि अभिनेत्रींनाही रिल्स तयार करण्याचं वेड लागलं आहे. मानसी नाईक ते क्रांती रेडकर यांचे रिल्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. त्यात आता आणखी एक बिगबॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटीलच्या नावाचा समावेश झाला आहे. अभिनेत्र सोनालीने क्रांती नाना मळेगावकरसोबत 'लव्ह कराव वाटतंय गं आता म्हातारपणात, या गाण्यावर रील तयार केला आहे. सोनालीचा हा रील आता चर्चेत आला आहे.

'मराठी बिग बॉस' या शोच्या सिझन ३ मध्ये अभिनेत्री सोनाली पाटीलने सहभाग नोंदवला होता. सोनालीने या शोमध्ये चांगली खेळली होती. सोनाली पाटीलने अभिनयाच्या जोरावर चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. याच सोनाली पाटीलचा आता नवा सिनेमा सिनेमागृहात येत आहे. 'जय भीम पँथर' असे या चित्रपटाचे नाव आहे. या सिनेमात सोनाली पाटीलची महत्वाची भूमिका आहे. 'जय भीम पँथर' सिनेमामुळे सोनाली चर्चेत आली आहे. याच मराठी बिगबॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटीलचा एक रील चर्चेत आलाय.

सोशल मीडियावर प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यावरील रिल्स प्रचंड व्हायरल होतात. त्यांच्याच 'लव्ह कराव वाटतंय गं आता म्हातारपणात...'या प्रसिद्ध गाण्यावर सोनाली पाटीलने अभिनेता क्रांती नाना मळेगावकरसोबत रील केला आहे. या रिलमध्ये सोनाली पाटील डान्स करताना दिसत आहे. सोनालीचा रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून तिच्या हावभावाचेही कौतुक केले जात आहे. क्रांती नाना मळगावकरने त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा रील शेअर केला आहे. या रीलला ५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिच्या रीलवर कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. तसेच शेकडो लोकांनी हा रील्स शेअर केला आहे.

दरम्यान, सोनाली पाटीलच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने काही महिन्यांपूर्वी 'सोनी मराठी' वाहिनीवरून 'गाथा नवनाथांची' या मालिकेत झळकली होती. तिने 'वैजू नंबर वन', 'जुळता जुळता जुळतंय की', 'देवमाणूस' यांसारख्या लोकप्रिय मालिकेतही सोनालीने काम केलं आहे. तसेच तिने हिंदी मालिकेतही काम केलंय. 'वागले की दुनिया' या हिंदी मालिकेत सोनालीला काम करण्याची संधी मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सदाभाऊ खोतांची पंचाईत, शेतकऱ्यांनी बांध्यावर थांबूही दिलं नाही; थेट हिशोबच मागितला | VIDEO

Rashi Bhavishya: सोमवारपासून या ३ राशींचे नशीब चमकणार, पैसा अन् प्रेमाचा वर्षाव होणार

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

Soft Idli Recipe: इडली फुगतच नाही? बॅटरमध्ये घाला '१' पदार्थ, सॉफ्ट - साऊथ स्टाईल इडलीचं सिक्रेट

BSNL Prepaid Plan: स्वस्तात दमदार ऑफर! बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा दररोज 2.5GB डेटा आणि अनेक फायदे

SCROLL FOR NEXT