क्रिकेटच्या या सामन्यात भोजपुरी गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली. क्रिकेट आणि भोजपुरी गाण्यांची आवड दिसली. एका व्यक्तीने भोजपुरी स्टार पवन सिंग यांचे गाणं वाजवण्याची विनंती केली यावेळी मॅनेजमेंट टिमने देखील भोजपुरी गाणं सुरू केलं याचदरम्यानचा हा व्हिडीओ आहे जो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, क्रिकेटच्या स्टेडियममध्ये भोजपुरी गाणं वाजवण्यात आलं आहे. ज्यामुळे संपूर्ण स्टेडियममध्ये गाणे वाजताच संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले आणि प्रेक्षक नाचू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाईव्ह मॅच पाहत असताना हे सुरू आहे. अनेक लोक मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचले आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट केले आहेत. बिग बॉस ते क्रिकेट मॅच भोचपुरी गाण्याचा जलवा आहे. अशी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जलवा है भाई जलवा है.. अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.