Bengaluru couple viral video  Saam tv
व्हायरल न्यूज

Bengaluru Couple Viral Video : लाजा सोडल्या! मेट्रो स्टेशनवरच तरुणाचे गर्लफ्रेंडशी अश्लील चाळे, व्हिडिओ पाहून तुम्हालाही चीड येईल

Bengaluru Metro Station Viral Video: बेंगळुरु मेट्रो स्टेशनवरच कपलचा रोमान्स व्हायरल झाला आहे. मेट्रो स्टेशनवरील हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही चीड येईल.

Vishal Gangurde

मेट्रो स्टेशन किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेकदा प्रेमी जोडप्यांचे अश्लील चाळ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होतात. सार्वजनिक ठिकाणी घाणेरडे कृत्य करणाऱ्या कपलवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होते. काही दिवसापूर्वीही कर्नाटकच्या बेंगळुरुतील कपलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. मेट्रो स्टेशनवरच या जोडप्याने अश्लील कृत्य केलं. बेंगळुरुतील कपलच्या कृत्यावर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका सुरु आहे.

बेंगळुरुच्या मदवारा मेट्रो स्टेशनवर कपलने कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील 'कर्नाटक पोर्टफोलियो' हँडल नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये एक कपल ट्रेनची वाट पाहत उभे आहे. ट्रेनची वाट पाहत असतानाच कपलचे अश्लील चाळे सुरु आहेत. व्हिडिओमध्ये आजूबाजूला अनेक प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत. काही प्रवासी कपलचे कृत्य पाहून चीड व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सने मेट्रो अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. एक युजरने 'आपण पुढील पिढ्यांना काय शिकवण देतोय? असा सवाल उपस्थित केला आहे. 'आता मेट्रो स्टेशन 'डेटिंग स्पॉट' बनू लागले आहेत, असे एकाने म्हटलं आहे.

'याच कारणामुळे ज्येष्ठ नागरिक पीक अवर्समध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय टाळतात, असे एका युजरने म्हटलं आहे. अनेकांनी कपलच्या घाणेरड्या कृत्यावर टीका केली आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, हे कपल बेंगळुरुतील नाही'.

मेट्रो स्टेशनवरील हा व्हिडिओ एक मिनिट ३० सेकंदाचा असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण समोर उभी असलेल्या तरुणीसोबत अश्लील कृत्य करत आहे. या तरुणाची गर्लफ्रेंड असण्याची शक्यता आहे. दोघे किती वयाचे आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही. दोघांचे अश्लील कृत्य पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. दोघांचे कृत्य आक्षेपार्ह असल्याने व्हिडिओ जोडण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT