सर्वत्र दुखाचं वातावरण शोकाकूल स्थितीत अंत्ययात्रा चालू होती, अचानक तिरडी खांद्यावर घेतलेल्या लोकांनी प्रेत खाली ठेवलं आणि सैरवैर पळू लागले. एखाद्या चित्रपटाच्या सीनसारखा प्रकार घडला. ना कोणी रडत होतं ना कोणी राम नाम सत्य है म्हणत होतं. फक्त पळा, पळा अशी आरडाओरड चालू होती.
ही घटना पाहून अनेकांना विचार पडला असेल, हे नेमकं काय झालं? त्याच झालं, असं जोधपूर जिल्ह्यातील खिंडाकोर गावात एक अंत्ययात्रा निघाली होती. एका झाडाखाली अंत्ययात्रा आल्यानंतर झाडावरील मधमाश्यांनी अंत्ययात्रेतील लोकांवर हल्ला चढवला. मग काय प्रेताला सोडून सर्व लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरवैर पळू लागले. मग मधमाश्यांच्या हल्याने इतकी दहशत निर्माण झाली की,लोक राम नाम सत्य है सुद्धा म्हणत नव्हते. ना कोणी रडत होतं. फक्त पळा पळा असा ओरडण्याचा आवाज येत होता.
ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील कोणाचं तरी निधन झालं होतं. कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जात होते. जवळजवळ संपूर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. परंतु अंत्ययात्रा एका झाडाजवळ पोहोचताच झाडावर असलेल्या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. काही क्षणातच वातावरण शोकाकूलचं किंचाळण्यामध्ये बदलले. मधमाश्यांचा हल्ला इतका भीषण होता की, लोक प्रेत तेथेच सोडून पळून गेले. अनेक लोकांना डझनभर मधमाश्यांनी चावा घेतला.
प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की मधमाशांचा हा हल्ला अचानक आणि अत्यंत धोकादायक होता. अनेक लोक प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एक वृद्ध व्यक्ती म्हणाले की, आम्ही शांततेत अंत्यसंस्कारासाठी जात होतो. पण मधमाश्यांनी आम्हाला जिवंत मारले. मधमाश्यांच्या पोळ आहेत.
अशा झाडांची ओळख पटवून तेथून मधमाशांचे पोळ काढून टाकावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केलीय. काही तासांनंतर, जेव्हा मधमाश्या शांत झाल्या, तेव्हा अंत्यसंस्कार प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. मधमाश्या पर्यावरणासाठी महत्त्वाच्या असल्या तरी, जेव्हा त्या हल्ला करतात तेव्हा त्या गंभीरित्या जखमी करत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.