Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : माझ्या राजाचं राजेपण...! पालकांनी चिमुकल्यांसोबत गायलं शिवरायांचं सुमधूर गाणं, व्हिडिओ पाहून अभिमान वाटेल

Viral Video : सोशल मीडियावर आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहतो,कधी डोळ्यात पाणी आणणारे असतात तर कधी मनाला आनंद देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक लहान मुलांना त्यांच्या लहान मुलांपासून काही गोष्टींची योग्य माहिती देणं गरजेचं आहे. जर लहान मुलांच्या वाढत्या वयात योग्या संस्कार केले नाही तर त्यांच्या मनावर अनेकदा विपरित परिणाम होतो. अशावेळी मुलांना लहानपणापासून प्रत्येक गोष्टींची संस्कार दिले तर ते मोठे झाल्यानंतर समजून घेण्यात जास्त अडचण येणार नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो पाहिल्यानंतर प्रत्येक पालकांनी नक्कीच असे केले पाहिजे.

सोशल मीडियावर कायम लहान मुलांचे गंमतीदार व्हिडिओ(Video) व्हायरल होत आहे. त्यात कधी लहान मुलांचे शाळेतील मस्ती असले किंवा अभ्यास न करण्यासाठी रडणं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं असे संस्कार सगळ्या मुलांवर झाले पाहिजे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, काही पालक (Parents) त्यांच्या लहान मुलांसह बसलेले आहेत. यात कोणी महिला आहेत तर काही पुरुष आहेत. हे सर्व पालक त्यांच्या लहान मुलांना काही म्हणण्यास शिकवत आहे. सर्व मुलंही आनंदाने आपल्या पालकांसोबत बोलताना दिसत आहे. मात्र तुम्ही नीट ऐकले तर सर्व पालक आपल्या लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी असलेले एक मराठी गीत शिकवत आहे. याचे इंद्र जिमि जंभ पर ' असे या गीताचे बोल आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील @_mr_mohan_96k या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच अनेक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली आहे की,'अशीच पिढी घडवा'तर अनेकांनी त्या पालकांसह लहान मुलांचे कौतुक केले आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसच्या काळात झालेली आहे - विजय वडेट्टीवार

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT