Couple Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: बायकोसाठी हे फक्त नवराच करू शकतो; VIDEO बघून डोळ्यांत टचकन पाणी येईल

Couple Viral Video: नवरा-बायकोच नात हे अधिक सुंदर असतं. पती पत्नीमधील नात्यात भयंकर वाद आणि हाणामाऱ्याप्रमाणे अतुट प्रेमही पाहायला मिळत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aged Grandparents Viral Video

नवरा-बायकोच नात हे अधिक सुंदर असतं. पती पत्नीमधील नात्यात भयंकर वाद आणि हाणामाऱ्याप्रमाणे अतुट प्रेमही पाहायला मिळत. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला नवऱ्याने बायकोसाठी आणि तसेच बायकोने नवऱ्यासाठी केलेले किस्से पाहायला मिळतात. आपल्या बायकोचे हट्ट पुरवणारे तसे फार कमी पुरुष असतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही असाच एक वयोरुद्ध आजी आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रेम भावनेला अगदी वस्तु सारखे वागवले जाते. प्रेमातला गोडवा शेवट पर्यंत टिकवणे काही व्यक्तींना कठीण जाते. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रेमाचे किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर एका आजी-आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिली आहे.

आजी-आजोबांचा व्हिडिओ इस्टाग्रामवरील @abhaygiri21 या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. खुप दिवसानंतर इंटरनेटवरील व्हिडिओच्या खजिन्यात एका सुंदर व्हिडिओची भर पडलेली आहे. आजी-आजोबांच्या व्हिडिओने काही नेटकरी भारावून गेलेत.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आजी -आजोबा घरातील कट्ट्यावर बसलेत. यात आजोबा अत्यंत काळजीने आपल्या पत्नीचे नाजूकपणे केस विचंरत आहेत. आपला पती केस विचंरताना असल्याचा आनंद आजीच्या चेहऱ्यावरुन आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे.

सोशल प्लॅटर्फामवर व्हिडिओ पोस्ट होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. २दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल होताच हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत तसेच अनेक माध्यमात शेअरही केला जातोय. एका यूजरने लिहिले आहे की,'इथं पर्यंत साथ देणारा पाहिजे' तर आणखी नेटकरी प्रतिक्रिया देत भावूक झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT