Banana Leaf Halwa Saam TV
व्हायरल न्यूज

Banana Leaf Halwa : केळीच्या पानांचा शिरा, तुम्ही कधी खाल्लाय का? युनीक रेसिपीसाठी पाहा व्हिडिओ

Viral Video : सोशल मीडियावर सध्या केळीच्या पानांपासून बनवलेला शिरा रेसिपी व्हायरल झाली आहे. एका फूड व्लॉगर तरुणाने या रेसिपीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Ruchika Jadhav

Banana Leaf Halwa Video :

केळीचा शिरा सर्वचजण मोठ्या चवीने खातात. पूजेसाठी बनवला जाणारा शिऱ्याचा प्रसाद हा देखील जास्तीत जास्त तूप आणि केळी अ‍ॅड करून बनवला जातो. केळीसह विविध फळे अ‍ॅडकरून देखील वेगळ्या फ्लेवरचा शिरा बनवला जातो. मात्र तुम्ही कधी केळीच्या पानांचा शिरा खाल्ला आहे का?

सोशल मीडियावर सध्या केळीच्या पानांपासून बनवलेला शिरा रेसिपी व्हायरल झाली आहे. एका फूड व्लॉगर तरुणाने या रेसिपीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांना ही रेसिपी कमालीची आवडली आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण सुरुवातीला केळीची काही पाने स्वच्छ पाण्याने धुवून घेतो. त्यानंतर या पानांच्या मधल्या शिरा पातळ कापल्या आहेत. संपूर्ण पान गोलाकारात दुमडून घेतलं आहे. त्यानंतर त्याचे बारीक काप करून घेतलेत. अगदी अळूवडी असते त्याप्रमाणे हे ताप करण्यात आले आहेत.

त्यानंतर मिक्सरमध्ये सर्व चिरलेली पाने टाकलीत. त्यात थोडं पाणी टाकून याची पातळ पेस्ट बनवून घेतली आहे. पुढे एका सफेद रंगाच्या सुती कापडात संपूर्ण मिश्रण गाळून घ्या. यातील पाणी वेगळं आणि पानांचा चोथा वेगळा करून घ्या. काही वेगळा करून घ्या.

पुढे एका पॅनमध्ये आधी तूप टाकून घ्या. तूपामध्ये पानांचे गाळलेले पाणी टाकून घ्या. त्यानंतर छान परतून घ्या. थोड्यावेळाने त्यात साखर, एक चिमुट मीठ आणि एका वाटीत पाणी आणि कॉर्न फ्लावर पीठ मिक्स करून त्यात टाका. थोडावेळ हे शिजवल्यानंतर त्यात ड्रायफ्रूट्स अ‍ॅड करा.

तयार झाला तुमचा केळीच्या पानांपासून बनलेला हलवा किंवा शिरा. @great_indian_asmr या इस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. केळीच्या पानांपासून बनवलेला शिरा आरोग्यासाठी फार पौष्टीक असतो असा दावा देखील त्याने यात केला आहे.

तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्हुव्ज मिळालेत. काहींना ही रेसिपी आवडली आहे. तर काहींनी यावर टीका करत हस्यास्पद कमेंट केल्यात. असा शिरा खा आणि दुसऱ्या दिवशी दवाखान्यात अ‍ॅडमीट व्हा, अशी कमेंट एकाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT