Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रिक्षा आली अन् राइड कॅन्सल केली, चालकाने भररस्त्यात लगावली तरुणीच्या कानशिलात;VIDEO व्हायरल

Viral Video: प्रवास करताना दररोज अनेक घडना घडत असतात. सध्या अशीच एक घटना तरुणीसोबत घडलेली आहे. ज्यात रिक्षा राईड कॅन्सल केल्याने तिला थेट रिक्षा चालकाने कानशिलात लगावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात दर सेकंदाला अनेक गोष्टी घडत असतात. घडलेल्या गोष्टींची सर्व माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचली जाते. त्यानंतर घडलेल्या गोष्टींवर अनेक चर्चा होतात तर अनेकदा घडलेल्या गोष्टींची सत्यताही माहिती पडते. मग काय खरे का खोटे हे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून समजले जाते. सध्या सोशल मीडियावरही एक धक्कादायक घटना सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

तुम्हीच नाही तर प्रत्येकजण कधीना कधी प्रवास (travel) करण्यासाठी ऑनलाइन रिक्षा बुक करतो. मात्र ऑनलाइन रिक्षाची सुविधा येण्याआधी साधारण रिक्षा स्टॅटवर जाऊन रिक्षा शोधा, मग कधी सुट्ट्यापैशांसाठी रिक्षाचलकाशी वाद,असे अनेक प्रकार तुमच्यासोबत घडलेले असतीलच. अनेकदा रिक्षाचालकाशी वाद होतात तर अनेकदा प्रवाशी आणि रिक्षाचालकांची हाणामारीही होताना तुम्ही पाहिली असेल.

मात्र सध्या व्हायरल होत असलेली घटना (event) अशीच काहीशी आहे. ज्यात एका तरुणीने ऑनलाइन रिक्षा राईड कॅन्सल केल्याने संतापलेल्या रिक्षाचालकाने थेट तरुणीच्या कानशिलात लगावली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

तरुणीसोबत घडलेला सर्व प्रकार बेंगळुरू शहरातील आहे. जिथे एका तरुणईने ऑनलाइन (Online) रिक्षा बुक केली होती. बुक केल्यानंतर पुढील प्रवासासाठी तरुणीनी रिक्षामध्ये बसली मात्र काही कारणांमुळे तरुणीने ऑनलाइन रिक्षाची राईट कॅन्सल केली आणि दुसरी रिक्षामध्ये जाण्यासाठी गेली. ही सर्व बाब ऑनलाइन रिक्षा (Auto) राईड कॅन्सल केलेल्या रिक्षाचालकास आवडली नाही. त्यामुळे त्याने रागात तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र दोघांमधील वाद टोकाला गेला की त्या रिक्षाचालकाने तरुणीला थेट कानाखाली मारले. सर्व वादविवादाचा व्हिडिओ तरुणीने तिच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@GharKeKalesh'' या नावाच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळानंतर या घटनेसंबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात या रिक्षाचालकास अटक करण्यात आलेल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक यूजर्संनी त्यांचे मत व्यक्त केलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT