ATM machine x
व्हायरल न्यूज

₹५०० काढले, ११०० रूपये निघाले, ATM मधून पैशांचा पाऊस, लोकांची तुफान गर्दी | VIDEO

Villagers rush to ATM after news of free cash : आग्रामधील एटीएमने ५०० काढल्यानंतर ११०० रुपये दिल्याने खळबळ उडाली. गावकऱ्यांनी गर्दी करत पैसे काढले. पोलिसांनी एटीएम सील करून तपास सुरू केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Viral Video News in Marathi : एटीएममध्ये तुम्ही ५०० रूपये काढायला गेलात अन् तुमच्या हातात ११०० रूपये पडले तर... हे काल्पनिक वाटत असेल, पण उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये हे घडलेय. मलपुरामधील नगला गावात एटीएममधून ५०० रूपयांच्या ऐवजी ११०० रूपये येत होते. त्यामुळे एटीएमच्या बाहेर लोकांची तुफान गर्दी झाली होती. प्रत्येकजण पैसे काढण्यासाठी गोंधळ घालत होता. एटीएममधून जसा पैशांचा पाऊस पडत होता. गर्दी अन् चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचं समजताच पोलिसांनी एटीएमकडे धाव घेत कारवाई केली.

मलपुरामधील नगला बुद्धा गावातील वन इंडिया बँकेच्या एटीएममधून ५०० रुपये काढण्यासाठी गेलेल्या लोकांना तब्बल ११०० रुपये मिळाले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच एटीएमवर लोकांची तुफान गर्दी जमली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक रहिवासी सोनू याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याने एटीएममधून ५०० रुपये काढले, पण मशीनने त्याला ११०० रुपये दिले, आणि खात्यातून फक्त ५०० रुपये कापले गेले. सुरुवातीला त्याला वाटले की काहीतरी चूक झाली, पण दुसऱ्यांदा पैसे काढले तेव्हाही तीच गोष्ट झाली. त्याने ही बाब आपल्या ओळखीच्या लोकांना सांगितली, आणि मग ही बातमी गावभर पसरली.

गावकऱ्यांनी घेतला फायदा

बातमी पसरताच गावातील ५० ते ६० लोकांनी एटीएम कार्ड घेऊन एटीएमवर धाव घेतली. प्रत्येकजण ५०० रुपये काढत होता आणि त्यांना ११०० रुपये मिळत होते. पण जेव्हा कोणी ५०० पेक्षा जास्त रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अतिरिक्त पैसे मिळाले नाहीत.

पोलिसांनी बंद केले एटीएम -

या घटनेची माहिती मिळताच मलपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ धाव घेतली. त्यांनी एक एटीएम वापरून पैसे काढून तपासणी केली. त्यांनाही ही चूक आढळली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ एटीएम बंद केले. ही गडबड तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बँकेकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही. बँक आता याचा तपास करत आहे की ही चूक कशी झाली आणि गावकऱ्यांनी किती अतिरिक्त पैसे काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT