Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: खोड काढली अन् चांगलीच जिरली! खवळलेल्या बैलाने उचलून आपटलं; थरारक VIDEO

Viral Video News: अनेकदा या प्राण्यांची खोड काढल्यामुळे ते हल्ले करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बैलाची विनाकारण खोड काढणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या जनावरांनी हल्ला केल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा या प्राण्यांची खोड काढल्यामुळे ते हल्ले करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बैलाची विनाकारण खोड काढणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

सोशल मीडिया (Social Media) म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका बैलाने तरुणावर हल्ला केल्याचे दिसत आहे.

बैलाला डिवचण्याची चूक हा तरुण करतो आणि खवळलेला बैल त्याला थेट शिंगावर घेऊन आपटतो. मुक्या प्राण्याला नाहक त्रास देणे या तरुणाच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. ज्यामध्ये त्यांनी या तरुणाचीच चूक असल्याचे म्हणले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बैलाला विनाकारण डिवचताना त्याला उकसवताना दिसत आहे. तो तरुण मुद्दाम त्या बैलासमोर हातवारे करत आहे. तरुणाच्या या प्रकारामुळे तो बैल चांगलाच खवळतो. बैल थेट त्याच्याकडे धावत जातो आणि शिंगाने उचलून फेकतो. बैलाचा हा हल्ला इतका जोरदार होता की तरुणाला चांगली जखम झाल्याची शक्यता आहे.

बैलाच्या हल्ल्यानंतर तरुण जागीच निपचित पडून राहतो. ज्यानंतर काही लोक त्याला उचलून नेतात. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत ६.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना या तरुणाचीच चूक असल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी विनाकारण मुक्या जिवाला त्रास देऊ नये.. असेही म्हणले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking water after meals: जेवणानंतर लगेच पाणी पिताय? वाचा तुमची ही सवय आरोग्यासाठी किती ठरतेय धोकादायक

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Breaking : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुन्हा रूग्णालयात दाखल करणार

Ajit Pawar Death : अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Kandyache Muthe Recipe : कांद्याचे मुठे अन् गरमागरम भाकरी; रविवारचा गावरान बेत, वाचा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT