Brain Stroke  Google
व्हायरल न्यूज

Air Pollution: हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Brain Stroke : सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, यात ब्रेन स्ट्रोक कशामुळे होतो याची माहिती देण्यात आलीय. या व्हायरल सत्य काय हे साम टीव्हीने समोर आणलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

हवेच्या प्रदुषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होतो असा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय. हवा प्रदुषण ही समस्या गंभीर आहे. बऱ्याच ठिकाणी हवेचं प्रदुषण असतं. त्यामुळे खरंच हा दावा खरा आहे का? हवेच्या प्रदुषणाचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

वायू प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोक होतो. वायुप्रदूषणामध्ये आढळणाऱ्या सबराक्रोइडमुळे मेंदूच्या आत रक्तस्राव होऊन गंभीर परिणाम होतात. हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली. अनेक वेबसाईट्स शोधल्या. असा कुठे रिसर्च आहे का? याबाबत आमच्या टीमनं पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला हा दावा करणारा एक रिपोर्ट सापडला. त्यामध्ये काय दावा केलाय पाहुयात.

लॅन्सेटच्या अहवालात काय?

वायू प्रदूषणामध्ये आढळणाऱ्या सबराक्रोइडमुळे मेंदूच्या आत रक्तस्राव होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. भारत, अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील आणि यूएई येथील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय टीमसोबत संशोधन केलंय.

भारतातील तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. या प्रकरणात गेल्या 5 वर्षांत 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आलंय. हा दावा खरा आहे का? प्रदूषणामुळे हे परिणाम होऊ शकतात का? हे आम्ही एक्सपर्टकडून जाणून घेतलं. आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य आणि साम इन्व्हिस्टिगेशन

वायू प्रदूषणाचं प्रमाण किती आहे यावर ब्रेन स्ट्रोक अवलंबून

हृदयविकाराचे आजार, बीपी, शुगर असेल तर स्ट्रोक येण्याची शक्यता

35 ते 40 वयातील लोकांमध्ये ब्रेन स्ट्रोक होण्याचं प्रमाण वाढलंय

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव

तणाव, अपुरी झोप या कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो

आजच्या तरुणांची जीवनशैली खूप बदललीय. त्यामुळे हृदय आणि मेंदूवर विपरीत परिणाम होतो.आमच्या पडताळणीत हवेच्या प्रदुषणामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT