Air Pollution Side Effects : वाढत्या वायूप्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम, जडतोय श्‍वसनविकाराचा आजार; कशी घ्याल काळजी?

Air Pollution Affect Health : वायू प्रदूषणामुळे विविध ऋतूंमध्‍ये पर्यावरणीय आरोग्‍यविषयक समस्‍या निर्माण होतात जसे उन्‍हाळ्यादरम्‍यान धुळीचे वातावरण होते, हिवाळ्यादरम्‍यान धूर व धुके निर्माण होतात , म्‍हणून या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
Air Pollution Side Effects
Air Pollution Side EffectsSaam Tv
Published On

Air Pollution :

वायू प्रदूषणामुळे विविध ऋतूंमध्‍ये पर्यावरणीय आरोग्‍यविषयक समस्‍या निर्माण होतात जसे उन्‍हाळ्यादरम्‍यान धुळीचे वातावरण होते, हिवाळ्यादरम्‍यान धूर व धुके निर्माण होतात , म्‍हणून या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

आरोग्‍य तज्ञ खराब हवेचा दर्जा आणि वाढते श्‍वसनविषयक आजार (Disease) यांच्‍यामधील संबंधाबाबत मत व्‍यक्‍त करत असताना अशा समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.

अॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. जेजो करण कुमार म्‍हणाले, ''जीवनवाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर व्‍यक्‍तींना आरोग्‍यदायी राहण्‍यास मदत करणे महत्त्वाचे आहे. यादरम्‍यान वायू प्रदूषण (Air Pollution) व श्‍वसनविषयक आजार जसे फ्लू यांचा सामना करावा लागू शकतो.

Air Pollution Side Effects
Hair Loss : सततच्या गळणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश, केस होतील दाट आणि शायनी

विशेषत: फ्लू आजाराच्‍या केसेस वाढत असताना व्‍यक्‍ती फ्लू सारख्‍या संसर्गांपासून स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासाठी करू शकणाऱ्या उपाययोजनांबाबत जागरूकतेचा प्रसार करणे महत्त्‍वाचे आहे. प्रतिबंधात्‍मक केअर महत्त्‍वपूर्ण आहे, तसेच विशेषत: या आजाराचा धोका असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी अनिवार्य आहे. म्‍हणून अधिक संरक्षणासाठी दरवर्षाला फ्लूची लस घ्‍या.''

आरोग्य आणि उत्तम स्वास्थ्यासाठी श्वासोच्छवासाकरिता शुद्ध हवा आवश्यक आहे. तरीदेखील, जगभरात वास्‍तविक स्थिती काहीशी वेगळी आहे. उदा. २०२२ मध्‍ये जगभरातील सर्वात प्रदूषित टॉप १० शहरांमध्‍ये सहा शहरे भारतातील आहेत.

एअर क्वॉलिटी लाइफ इंडेक्सच्या अहवालामधून निदर्शनास आले की, हवेतील उच्‍च प्रदूषण किंवा प्रदूषक घटक (जसे धूर, धूळ आणि इतर) यामुळे भारतातील सरासरी व्‍यक्‍तीचा जीवनकाळ ५.३ वर्षांनी कमी होऊ शकतो, तुलनेत हवेचा दर्जा जागतिक आरोग्‍य (Health) संघटनेच्‍या मार्गदर्शकतत्त्वांनुसार असल्‍यास हे प्रमाण वाढू शकते.

वायू प्रदूषण उच्‍च प्रमाणात असलेल्‍या भागांमध्‍ये इन्‍फ्लूएन्‍झा (किंवा फ्लू) सारख्‍या श्‍वसनविषयक संसर्गांच्‍या केसेस देखील मोठ्या प्रमाणात आढळून आल्‍या आहेत. मुंबईतील नानावटी मॅक्‍स सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलमधील पल्‍मनरी अँड स्‍लीप मेडिसीनचे संचालक प्रो. डॉ. सलि‍ल बेंद्रे म्‍हणाले, ''खराब हवेच्‍या दर्जाचा व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि मी मुंबईतील धुके व वायू प्रदूषणामुळे रूग्‍णांच्‍या संख्‍येत जवळपास २० टक्‍के वाढ पाहिली आहे.

Air Pollution Side Effects
Cancer Prevention Tips : या सवयी आजपासून बदलाच, कर्करोगापासून राहाल दूर

अनेक व्‍यक्‍तींना श्‍वास घेण्‍यास त्रास व खोकला अशा लक्षणांचा त्रास होत आहे आणि गेल्‍या ३ महिन्‍यांमध्‍ये इन्‍फ्लूएन्‍झा सारख्‍या आजाराच्‍या केसेसमध्‍ये वाढ दिसण्‍यात आली आहे. प्रदूषित हवेमुळे फ्लू असलेल्‍या व्‍यक्‍तीला अधिक त्रास होऊ शकतो. ज्‍यामुळे व्‍यक्‍तींनी स्‍वत:चे संरक्षण करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. ते प्रतिबंधात्‍मक उपाय करू शकतात जसे बाहेर असताना मास्‍कचा वापर किंवा वायू प्रदूषण अत्‍यधिक असल्‍यास घरातच राहणे, उत्तम स्‍वच्‍छता पद्धतींचा अवलंब जसे बाहेरून आल्‍यानंतर चेहरा व हात स्‍वच्‍छ धुणे आणि संसर्ग टाळण्‍यासाठी दरवर्षाला फ्लू लस घेणे.

खराब हवेच्‍या दर्जामुळे क्रोनिक ऑब्‍स्‍ट्रक्टिव्‍ह पल्‍मनरी डीसीज सारख्‍या आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना फ्लूसारखे व्हायरल संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे श्वास घेण्‍यास त्रास होणे, खोकला, घरघर व छातीत दुखणे यांसारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.

यामागील कारण म्‍हणजे वाहनांमधून उत्‍सर्जित होणारे वायू, कोळसा व तेल सारख्‍या इंधनांच्‍या ज्‍वलनामुळे होणारे प्रदूषण अशा वायू प्रदूषणामुळे श्‍वसनसंस्‍थेचे नुकसान होऊ शकते आणि वायूमार्गाला त्रास होऊ शकतो. जागतिक स्‍तरावर पर्यावरणीय प्रदूषणाचे परिणाम देखील दिसून आले आहेत. युनायटेड स्‍टेट्समध्‍ये एअर क्‍वॉलिटी इंडेक्‍समध्‍ये फक्‍त एका युनिटच्‍या वाढीमुळे दरवर्षाला फ्लूमुळे अतिरिक्‍त ४,००० हून अधिक व्‍यक्‍ती हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात आली.

फ्लू आजार सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींना, विशेषत: पाच वर्षांखालील मुले, गरोदर महिला, वृद्ध व्‍यक्‍ती (६५ वर्ष व त्‍यापेक्षा अधिक) आणि आरोग्‍यविषयक आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना होऊ शकतो. प्रौढ व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत मुलांना प्रदूषक व व्‍हायरल संसर्गांच्‍या प्रतिकूल परिणामांचा अधिक धोका आहे आणि संशोधनामधून वायू प्रदूषण आणि अपर व लोअर रिस्‍पायरेटरी संसर्ग, विशेषत: फ्लू यांच्‍यामधील संबंध दिसून आला आहे. पालकांनी लसीकरणासह सुरूवात करत त्‍यांच्‍या मुलांच्‍या संरक्षणासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे.

Air Pollution Side Effects
Stress Management : परीक्षेचं टेन्शन होईल दूर; तणावमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या टिप्स फॉलो करा

गरोदर महिलांना देखील वायू प्रदूषणामुळे फ्लू सारखे संसर्ग होण्‍याचा धोका असू शकतो. याचा त्‍यांच्‍यावर विपरित परिणाम होऊ शकतो. गरोदर महिलेचे वायू प्रदूषणापासून संरक्षण केल्‍यास तिला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो आणि तिच्या बाळाचे आरोग्य अधिक चांगले राखण्यास मदत होते.

हात स्‍वच्‍छ धुणे किंवा फेस मास्‍कचा वापर करणे यांसारख्‍या उत्तम सवयी अंगिकारणे महत्त्‍वाचे आहे. आरोग्‍यदायी जीवनशैलीची निवड करत व्‍यक्‍ती स्‍वत:ची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवू शकतात आणि त्‍यांच्‍या फुफ्फुसाचे आरोग्‍य उत्तम ठेवू शकतात. तसेच नियमित व्‍यायाम करणे देखील फायदेशीर ठरू शकते. पण उच्‍च प्रदूषण असलेल्‍या कालावधीदरम्‍यान, विशेषत: दिवाळीनंतर वायू प्रदूषणाशी एक्‍स्‍पोजर टाळण्‍यासाठी घरामध्‍येच व्‍यायाम करण्‍याचा प्रयत्‍न करा. घराबाहेर असताना मास्‍कचा वापर उत्तम सवय आहे. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे ताप, सर्दी किंवा खोकला यांसारखी लक्षणे जाणवल्‍यास त्‍वरित डॉक्‍टरांकडे जा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com